गोव्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार, कोलवा पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा नोंद

By सूरज.नाईकपवार | Published: February 18, 2024 11:18 AM2024-02-18T11:18:37+5:302024-02-18T11:18:57+5:30

Goa News: एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार करुन नंतर त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी येथील कोलवा पोलिस ठाण्यात एका २२ वर्षीय युवकावर  गुन्हा नोंद झाला आहे.

A seventeen-year-old minor girl was sexually assaulted in Goa for two years, a case was registered against the suspect in Colwa police station | गोव्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार, कोलवा पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा नोंद

गोव्यात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार, कोलवा पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा नोंद

- सूरज नाईकपवार 
मडगाव - एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार करुन नंतर त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी येथील कोलवा पोलिस ठाण्यात एका २२ वर्षीय युवकावर  गुन्हा नोंद झाला आहे. प्रशांत बस्तवडकर असे संशयिताचे नाव असून, तो मूळ कर्नाटकातील बेळगाव जिल्हयातील नंदगड खानापूर येथील रहिवाशी आहे. भादंसंच्या३५४,३६३,३७६,३८३,५०६,३२३,५११, गोवा बाल कायदा कलम ८ , व बाल संरक्षण कायदा कलम ७ व ८ अंतर्गंत कोलवा पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक दिपा देयकर पुढील तपास करीत आहेत.

सध्या संशयित फरार असून, पोलिस त्याचा माग काढीत आहेत. जुलै २०२१ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत संशयिताने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. खानपूर, बेळगाव तसेच गोव्यातील विविध भागात नेउन तिच्यावर संशयिताने बलात्कार केला होता.तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मिडियावर व्हायरल करु अशी धमकीही दिली होती. तो पैशाची मागणी करीत होता. पिडिताच्या वडिलाने नंतर यासबंधी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पिडिताची वैदयकीय तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: A seventeen-year-old minor girl was sexually assaulted in Goa for two years, a case was registered against the suspect in Colwa police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.