राजधानीत उभारला अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2024 12:59 PM2024-02-17T12:59:45+5:302024-02-17T13:00:06+5:30
सोमवारी १९ रोजी शिवजयंती निमित्त पुतळ्याचे आनावरण होणार तसेच विधिवत पुजा होणार आहे.
-नारायण गावस
पणजी: साेमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने राजधानीत पहिला भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज्यांचा अश्वरुढ पुतळा उभारण्यात आला आहे. पणजी मळा शिवप्रेमींनी पुढाकार घेऊन युवकांनी हा पुतळा उभारला असून सोमवारी १९ रोजी शिवजयंती निमित्त पुतळ्याचे आनावरण होणार तसेच विधिवत पूजा होणार आहे.
राजधानी पणजीत यंदा प्रथमच अशी भव्य दिव्य अशी शिवमिरवणूक हाेणार आहे. पणजी महानगर पालिकेतर्फे यंदा शिवजयंती निमित्त रॅली काढली जाणार आहे. तसेच आता पणजी मळा युवक संघटनेतर्फे हा भव्य असा शिवपुतळा उभारल्याने अनेक शिवभक्तांमध्ये आनंद पसरला आहे. पणजी राजधानीत कुठेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नव्हता म्हापसा तसेच इतर राज्यातील बहुतांश शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अनेक संस्थानी आपल्यापरीने ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी महाराज्यांचे पुतळे उभारले आहेत. आता पणजी वासियांनी पुढाकर घेत हा पुतळा उभारला आहे.
पुतळ्यासाठी अनेकांनी दिली देणगी
हा पुतळा आणण्यासाठी तसेच उभारण्यासाठी पणजीतील अनेक उद्याेजकांनी, व्यावसायिक, राजकारणी तसेच समाज सेवकांनी आर्थिक सहाय केेले आहे. प्रत्येकाने आपल्यापरीने हा पुतळा उभारण्यासाठी देणगी दिली आहे. तसेच सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमातही सहभाग घेतला आहे. त्यामुळे उद्या पणजीत भव्य अशी मिरवणूक हाेणार आहे. तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार आहे. राज्यात पर्यटन खात्यातर्फे डिचाेली येथील छत्रपती शिवाजी मैदानावर राज्यव्यापी शासकीय शिवजयंती साजरी होणार आहे. तसेच इतर सर्व ठिकाणी सोमवारी शिवजयंतीचा माेठ्या उत्सहात कार्यक्रमही हाेणार आहे.