भाजपचा पराभव करण्यासाठी मजबूत संघटना गरजेची; विजय सरदेसाईंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 03:36 PM2023-10-25T15:36:24+5:302023-10-25T15:37:14+5:30

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे मत

A strong organization is needed to defeat the BJP; Opinion of Vijay Sardesai | भाजपचा पराभव करण्यासाठी मजबूत संघटना गरजेची; विजय सरदेसाईंचे मत

भाजपचा पराभव करण्यासाठी मजबूत संघटना गरजेची; विजय सरदेसाईंचे मत

पणजी: भाजपला निवडणूकीत हरविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकजूटपणा दाखविणे गरजेचे आहे. पण गाेव्यात तसेच होत नसल्याची खंत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. पणजी कार्यालयात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत होते.

भाजपची पक्ष संघटना मजबूत आहे. त्यामुळे विराेधी पक्ष संघटनेपेक्षा सत्ताधारी युती अधिक ताकदवान हाेत आहे. भाजप आपल्या सोबत युती केलेल्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन चालत आहे. आज जे भाजपचे नेते गोव्यात येतात ते फक़्त भाजपच्या मंत्री आमदारांप्रमाणे युतीच्या आमदारांसोबत चर्चा करत आहे. विरोधी पक्षातर्फे असे केेले जात नाही. आज गाेव्यात सक्षम विरोधक हवा, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

भाजपचे मंत्री आमदार त्यांच्या युतीची आमदारासाेबत वाद विवाद घालतात. तर दुसऱ्या बाजूने याच भाजपचे नेते त्यांना एकत्र घेऊन चर्चा करतात, असेही विजय सरदेसाई म्हणाले. आता वीज मंत्र्यांनी तनमार प्रकल्प गोव्यात आणण्याचा प्रचार केला आहे. याचे परिणाम गाेव्यातील लाेकांवर होणार आहे. राज्यातील शेत जिमिती नष्ट होणार आहे. हे भाजप सरकार राज्याचा विकास करत आहे की लोकांची लुबडणूक करत आहे हे लाेकांना आता समजणे गरजेचे आहे. पर्यावरणाची हानी करुन कुणाला विकास नकाे आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.

भाेमाचे लाेक अनेक दिवस चौपदरी मार्गासाठी विरोध करत आहे. पण तरीही सरकार आपल्या मताशी स्थिर आहे. त्याचप्रमाणे आता नावशी येथे प्रकल्प आणला जातो. यालाही सरकार पाठींबा देत आहे. सरकार माेठ माेठे प्रकल्पांना पाठींबा देत आहे लाेकांचाा विचार करत नाही, असेही विजय सरदेसाई म्हणाले.

Web Title: A strong organization is needed to defeat the BJP; Opinion of Vijay Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.