मासळी सुकविण्यासाठी गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Published: November 9, 2023 02:32 PM2023-11-09T14:32:02+5:302023-11-09T14:32:25+5:30

गोव्यातील खड्डे बाळ्ळी येथे घडली घटना.

A woman died after being touched by a high-pressure power line when she went to dry fish on the roof of a house: an incident at Khadde Balli in Goa. | मासळी सुकविण्यासाठी गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू

मासळी सुकविण्यासाठी गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू

मडगाव : घराच्या छतावर मासळी सुकविण्यासाठी घेउन जात असताना उच्च दाबाच्या वीज वाहिन्याचा स्पर्श होउन एका साठ वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. गोव्यातील दक्षिण गोव्यातील खड्डे बाळ्ळी येथे आज गुरुवारी ही दुदैवी घटना घडली. चंद्रावती शाबा वेळीप असे मयताचे नाव आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी ही घटना पोलिस दफ्तरी नोंदवून घेतली आहे. या घटनेमुळे या भागात शाेकाकुल वातावरण झाले.कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक पुढील तपास करीत आहेत.

गुरुवारी सकाळी ९ ते साडेदहाच्या दरम्यान वरील घटना घडली. मयत चंद्रावती हिच्या पाश्चात मुलगा व पती असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या घराच्या छतावरुन उच्च दाबाची वीज वाहिनी आहे. तीचा स्पर्श तिला झाला . विद्युत झटकेने घटनास्थळीच तिला मरण आले. या घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर संबधितांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला.

Web Title: A woman died after being touched by a high-pressure power line when she went to dry fish on the roof of a house: an incident at Khadde Balli in Goa.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.