पतीसमवेत दुचाकीवरुन जात असताना गोव्यातील बार्से येथे अपघातात महिला ठार
By सूरज.नाईकपवार | Published: February 21, 2024 04:42 PM2024-02-21T16:42:27+5:302024-02-21T16:42:44+5:30
ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात घडल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांनी दिली.
मडगाव: पतीसमवेत दुचाकीवरुन जात असताना बेलोनो कारची धडक बसल्याने सुवर्णा गावकर (५४) ही महिला ठार झाली.गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील बार्से येथेआज बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास अपघाताची वरील घटना घडली. या अपघातात तिचे पती चंद्रकांत गावकर हेही जखमी झाले आहे.
ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात घडल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांनी दिली. मयत काणकोण तालुक्यातील आहे. काही कामानिमित्त ते मोटरसायकलवरुन मडगावच्या दिशेने जात होते. त्यांच्या पाठीमागून एक बोलेनो कार येत होते. त्या कारने ओव्हरटेक करण्याचा प्र्यत्न करताना दुचाकीला धडक दिली.
यात सुवर्णा या गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला तिला बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर तिला मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. कुंकळ्ळी पोलिसांनी अपघातस्थळी जाउन पंचानामा केला. पुढील पोलिस तपास चालू आहे.