गोव्यात आम आदमी पक्षाचा प्रमुख ॲड. अमित पालेकर याला अटक

By किशोर कुबल | Published: August 31, 2023 04:18 PM2023-08-31T16:18:01+5:302023-08-31T16:18:44+5:30

अपघातास जबाबदार चालकाला वाचवण्यासाठी बनावट ड्रायव्हर तयार केला तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

Aam Aadmi Party chief Goa Adv. Amit Palekar arrested | गोव्यात आम आदमी पक्षाचा प्रमुख ॲड. अमित पालेकर याला अटक

गोव्यात आम आदमी पक्षाचा प्रमुख ॲड. अमित पालेकर याला अटक

googlenewsNext

पणजी :  बाणस्तारी अपघात प्रकरणी आम आदमी पक्षाचे गोव्याचा प्रमुख ॲड. अमित पालेकर याला क्राइम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. या भीषण अपघाताचे कारण ठरलेल्या सावर्डेकर दाम्पत्याला वाचवण्यासाठी बनावट ड्रायव्हर तयार केला तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 

ॲड. पालेकर याला दुपारी क्राइम ब्रांच पोलिसांनी रायबंदर येथे कार्यालयात चौकशीसाठी आणले. काही वेळ चौकशी करून त्याला अटक करण्यात आली. अपघाताच्या दिवशी जी 'ओली' पार्टी झाली होती तींत सावर्डेकर कुटुंबीयांसह पालेकर हासुद्धा  उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

पार्टीनंतर बाणस्तारी येथे परेश सावर्डेकर, मेघना सावर्डेकर व त्यांची अन्य दोन मुले असलेल्या मर्सिडीज कारने भीषण अपघात घडवून तिघांचे बळी घेतले. कारमध्ये मद्याच्या बाटल्याही सापडल्या होत्या. अपघाताच्या वेळी कार

कोण चालवत होता, यावरून तर्कवितर्क आहेत. सावर्डेकर दाम्पत्याला पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी पालेकर यानी लगेच बनावट ड्रायव्हर तयार केला व म्हार्दोळ पोलीस स्थानकात आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पालेकर याने फेब्रुवारी २०२२ ची विधानसभा निवडणूक सांताक्रुज मतदारसंघातून 'आप'च्या तिकीटावर लढवली होती. आम आदमी पक्षाने त्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणूनही त्यावेळी जाहीर केले होते. परंतु निवडणुकीत त्याचा पराभव झाला.

भाजप प्रवेशासाठी दबाव होता ; नकार दिला म्हणूनच ही कारवाई केली  - पालेकर याचा दावा

    दरम्यान, पालेकर याने पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की 'माझी प्रतिमा खराब करण्यासाठीच हे सर्व काही केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्यावर भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी दबाव होता. भाजपात प्रवेश न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे, असा इशाराही मला देण्यात आला होता.भाजपकडून पूर्णपणे घाणेरडे राजकारण चालू आहे. अपघात प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना मला टार्गेट केले जात आहे.' पणजी सत्र न्यायालयात जामिनासाठी आपण अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Aam Aadmi Party chief Goa Adv. Amit Palekar arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :AAPआप