गोव्यात ‘आप’चाही उदय होणार?
By admin | Published: March 10, 2017 02:18 AM2017-03-10T02:18:30+5:302017-03-10T02:21:39+5:30
पणजी : गेल्या महिन्यात निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये
पणजी : गेल्या महिन्यात निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी प्राप्त होईल, असे मतदानोत्तर चाचण्या म्हणतात, तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि ‘आप’मध्ये अत्यंत चुरशीची लढत होऊन तेथे भाजप व अकाली दलाचा धुव्वा उडणार आहे. ‘आप’चे यश गोव्यात ठळकपणे दिसेल, असे हा सर्व्हे म्हणतो. त्यामुळे गोव्यात ्न‘आप’चा उदय होईल का, याविषयी चर्चा होऊ लागली आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला मोठे यश मिळणार असले तरी त्यांना बहुमत मिळणार नाही. त्यामुळे तेथे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. त्यात उत्सुकतेत भर म्हणजे गुरुवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला पक्ष मायावतींच्या बसपाबरोबर युती करण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले.
‘इंडिया टुडे’ मतदार चाचणीत ४० जागांच्या गोवा विधानसभेत भाजपला १८ जागा मिळणार असल्याचा निष्कर्ष निघाला. हा अंदाज म्हणतो : काँग्रेस (९-१३), भाजप
(१८-२२), आप (०-२). एमआरसीने भाजपला १५ जागा तर काँग्रेसला १० जागा मिळणार असल्याचे सांगून आप ७ तर इतरांना आठ जागा मिळणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे.
टाइम्स नाऊ व सीव्होटर्स यांच्या चाचणीनुसार भाजपला १५-२१, काँग्रेस पक्षाला १२-१८ व आपला शून्य ते चार जागा मिळण्याचा संभव आहे.
या चाचण्या खऱ्या मानायच्या तर गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. तीन चाचण्यांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष बनणार असल्याबद्दल एकमत आहे. तिन्ही चाचण्यांचा सारांश आहे, की भाजप १८ पर्यंत जाऊ शकतो व काँग्रेस पक्षाला २०१२ मध्ये जेवढ्या जागा (नऊ) मिळाल्या त्यात केवळ तीन जागांची भर पडेल. या तीन जागांवर ते भाजपचा पराभव करतील असे अनुमान आहे.
सर्व्हेनुसार, गोव्यात ‘आप’ला ठळक यश मिळेल व त्यानुसार त्यांना तीन तरी जागा खात्रीपूर्ण मिळतील. दिल्लीनंतर पक्ष वाढविण्याची संधी ‘आप’ला गोव्यात आहे, असे त्यांना वाटते. इतरांची संख्या १० वरून सातवर येईल, असेही चाचण्या म्हणतात.