पर्रीकरांचे संरक्षण खाते काढण्याची ‘आप’ची मागणी
By admin | Published: September 19, 2016 04:57 AM2016-09-19T04:57:06+5:302016-09-19T04:57:06+5:30
पर्रीकर गोव्यात अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवर वैयक्तिक टीका करण्यात मग्न होते, असा आरोप आम आदमी पार्टीने (आप) रविवारी केला
पणजी : जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात भारतीय धारातीर्थी पडले तेव्हा केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवर वैयक्तिक टीका करण्यात मग्न होते, असा आरोप आम आदमी पार्टीने (आप) रविवारी केला. पर्रीकर त्यांच्या खात्याला न्याय देऊ शकत नसतील, तर त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणीही ‘आप’ने केली आहे.
पर्रीकर संरक्षणमंत्रिपदाला न्याय देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना दिल्लीतच राहून गंभीरपणे हे खाते हाताळण्याची समज द्यावी किंवा त्यांच्याकडून हे खाते काढून घेऊन पूर्ववत त्यांना गोव्यात पाठवावे, असे ‘आप’च्या प्रदेश शाखेने म्हटले आहे. पर्रीकर ऊठसूट गोव्यात येत असतात, अशी टीका पक्षाचे सचिव वाल्मीकी नायक यांनी केली. आरोग्य सचिवांची केंद्र सरकारने तडकाफडकी बदली केल्याने ते पदही रिक्त होते. या गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात, असेही ते
म्हणाले. (प्रतिनिधी)