सरकारी नोकरी विकत घेऊ निघालेल्या १८ जणांना ३१ लाखांचा चुना; दोघांविरूद्ध गुन्हाची नोंद

By वासुदेव.पागी | Published: February 15, 2024 05:05 PM2024-02-15T17:05:28+5:302024-02-15T17:07:23+5:30

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोव्यातील १८ जणांना ३१ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.

About 31 lakh lime to 18 people who wanted to buy government jobs record of offense against both in goa | सरकारी नोकरी विकत घेऊ निघालेल्या १८ जणांना ३१ लाखांचा चुना; दोघांविरूद्ध गुन्हाची नोंद

सरकारी नोकरी विकत घेऊ निघालेल्या १८ जणांना ३१ लाखांचा चुना; दोघांविरूद्ध गुन्हाची नोंद

वासुदेव पागी,पणजी :  सरकारी नोकऱ्या मिळतात म्हटल्यावर  लोक किती जोखीम घेऊ शकतात याची प्रचिती देण्यारे प्रकरण आगशी पोलीस सद्या हाताळत आहेत. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोव्यातील १८ जणांना ३१ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे.

सासस्टीतील  जास डिकॉस्टा आणि  ज्वेन्सी डायस हे दोघे सरकारी नोकरी विकणारे दलाल असल्यी सारखे लोकांना पैसे द्या नोकऱ्या घ्या असे सांगत फिरत होते. त्याच्या या आमिषाला भुलून  १८ जण तयार झाले. त्यांनी पैसे ३१ लाख रुपये जमवून संशयितांना दिले. पण, नोकऱ्या काही मिळाल्याच नाहीत. कधी मिळणार नोकरी अशी त्यांच्याकडे  चौकशी केली असता ते मिळणार असेच सांगत होता. पण नंतर आपली फसवणूक झाल्याची त्यांना जाणीव झाली. 

एक पीढीत आल्टन  सिल्वेरा यांनी पोलिसांत तक्रारी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आता ईतर पीढीतही तक्रारी नोंदवित आहेत. या प्रकरणात संशयितांना अटक केली जाऊ शकते.

Web Title: About 31 lakh lime to 18 people who wanted to buy government jobs record of offense against both in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.