मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल
By वासुदेव.पागी | Updated: May 25, 2024 17:03 IST2024-05-25T17:02:19+5:302024-05-25T17:03:53+5:30
वास्तविक खंडणी मागितल्याने ती निमूटपणे देऊन टाकून नंतर पोलिसात तक्रार करण्याचा हा प्रकार अजब वाटल्यामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहेत.

मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल
वासुदेव पागी, पणजीः ३४ लाख रुपये खंडणी द्या अन्य था तुच्या मुलाला जीवे मारले जाईल, अशी धमकी देण्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांनी तिघांवर गुन्हे नोंदविले आहेत
दोनापावला येथील आर्यन सडवेलकर याने पणजी पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारी नुसार संशयित लोकेश सुरेश कवळेकर या करंजाळे येथील इसमावर गुन्हा नोंदविला आहे. संशयितांने आर्यन याच्या पालकांना फोन करून धमकी दिली. त्यांच्याकडे ३४ लाख रुपये मागितले. मुलाच्या जीवावर बेतू नये यासाठी तक्रदाराच्या पालकाने संशयितांनी ३५ लाख रुपये देऊन टाकले. मात्र आता या प्रकरणात तक्रारदारां पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा प्रकार मालमत्तेचा प्रकरणातील वादामुळे झाला असल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.
वास्तविक खंडणी मागितल्याने ती निमूटपणे देऊन टाकून नंतर पोलिसात तक्रार करण्याचा हा प्रकार अजब वाटल्यामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहेत. परंतु याप्रकरणात पणजी पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयित लोकेश याला अटक केली आहे.