पणजीतील स्मार्ट सिटीची ८० टक्के कामे पूर्ण
By पूजा प्रभूगावकर | Published: April 13, 2024 01:47 PM2024-04-13T13:47:02+5:302024-04-13T13:47:45+5:30
शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा स्मार्ट सिटीने केला आहे.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाचे काम ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा स्मार्ट सिटीने केला आहे. स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे ही डेडलाईन आहे.
सांतिनेझ, मळा, भाटले, तांबडीमाती, रायबंदर, १८ जून मार्ग, मार्केट परिसर आदी ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे मागील दीड वर्षांपासून सुरु आहेत.या कामांसाठी खोदकाम केल्याने अनेक भागांत वाहतूकीसाठी रस्ते बंद आहेत. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, चांगले रस्ते, उद्याने व अन्य विकास कामे केली जात आहेत. या कामांसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रायबंदर येथे सुध्दा स्मार्ट सिटीची कामे सुरु असून आता पर्यंत तेथील ९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर रायबंदर चा रस्ता वाहतूकीसाठी खुला केला जाईल. सध्या हा रस्ता बंद असल्याने जुने गोवे ते पणजी या मार्गावरुन वाहतूक सोडली जात आहे.