सावत्र बापाकडून चिमुरडीवर लैगिक अत्याचार; कर्नाटकातील हुबळ्ळी येथे घडली होती घटना
By सूरज.नाईकपवार | Updated: November 2, 2023 11:27 IST2023-11-02T11:27:11+5:302023-11-02T11:27:49+5:30
तेथील पाेलिस ठाण्यात आता हे प्रकरण पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवून देण्यात येणार आहे.

सावत्र बापाकडून चिमुरडीवर लैगिक अत्याचार; कर्नाटकातील हुबळ्ळी येथे घडली होती घटना
सूरज नाईकपवार, लोकमत न्युज नेटवर्क, मडगाव: सावत्र बापाकडून चिमुरडीवर लैगिक अत्याचार होण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गोव्यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात यासंबधी पिडिताच्या आईने तक्रार नोंदविली आहे. ही घटना शेजारच्या कर्नाटक राज्यातील हुबळ्ळी येथील रेल्वे प्लॅटफॉमवर घडली होती. तेथील पाेलिस ठाण्यात आता हे प्रकरण पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवून देण्यात येणार आहे.
पिडित पाच वर्षाची आहे. २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता संशयिताने त्या बालिकेशी लैंगिक चाळे केले होते. झालेल्या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल असे धमकावून जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्या अजाण बालिकेला आपल्यावर काय अत्याचार होत आहे याची कल्पनाही नव्हती. पिडिताच्या आईला जेव्हा ही बाब कळाली तेव्हा तिने गोव्यात आल्यानतंर यासंबधी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
संबधित कुटुंब हे गरीब आहेत. ते मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रहात आहे. तक्रारदाराचा एक मुलगा अपंग असून, तो हुबळी येथे शिकतो. दसऱ्याच्या सुट्टीत तो गोव्यात आला होता. त्याला परत हुबळी येथे पोहचविण्यास गेले असता, लैंगिक अत्याचाराही वरील घटना घडली हाेती अशी माहिती पोलिसांनी दिली. भादंसंच्या ३७६,३७६ (अब) , ५०६ व पोस्को कायदयातंर्गंत मायणा कुडतरी पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली आहे.