मापात पाप कराल, तर दंड भरावा लागेल; तब्बल ६० जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 10:30 AM2023-03-10T10:30:40+5:302023-03-10T10:31:03+5:30

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ६० जणांवर कारवाई केली आहे.

action against as many as 60 people in south goa market | मापात पाप कराल, तर दंड भरावा लागेल; तब्बल ६० जणांवर कारवाई

मापात पाप कराल, तर दंड भरावा लागेल; तब्बल ६० जणांवर कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: भाजीपाला, कडधान्ये व अन्य प्रकारच्या व्यापाऱ्यांनी वजन मापात फेरफार करून लोकांची फसवणूक करू नये म्हणून वजन व मापे खात्याचे कर्मचारी सक्रियपणे कार्यरत आहेत. छोटे-मोठे विक्रेते व व्यापाऱ्यांवर त्यांचे नेहमी लक्ष असते. दक्षिण गोव्यात वजन व मापे खात्याने गेल्या ६ महिन्यांत वजन-मापे तपासण्यासाठी शंभरहून अधिक छापे टाकले. त्यापैकी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ६० जणांवर कारवाई केली आहे.

दंडाची कृती वजन व मापे खात्याच्या संचालक कार्यालयाकडून केली जाते. किती वजनात दोष आढळला, त्यावर दंड दिला जातो; पण खात्याने दक्षिण गोव्यात गेल्या ६ महिन्यांत केलेल्या कारवाईत वजन- मापांत दोष व्यापाऱ्यांकडून ४ लाख रुपये दंड वसूल करून घेतलेला आहे.

मनुष्यबळ किती?

वजन व मापे खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ आहे. निरीक्षक, तसेच इतर कार्यालयीन कामकाज हाताळणे व कारवाई करण्यासाठी सोयीस्कर कर्मचारीवर्ग आहे. मनुष्यबळ कमी पडत नाही.

किती जणांवर कारवाई

वजन व मापे खात्याच्या मडगाव कार्यालयाने दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी छापे टाकून गेल्या ६ महिन्यांत शंभरहून अधिक व्यापायांच्या वजनाची तपासणी केली. त्यापैकी ६० जणांच्या वजनात दोष आढळून • आला. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक स्वरुपात कारवाई करण्यात आली.

अधिकारी-कर्मचारी दक्ष

वजन व मापे खात्याचे अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बाबतीत नेहमी दक्षता ठेवतात. कोणीही फोन करुन भेसळयुक्त पदार्थ किंवा वजन मापांत दोष असल्याचे कळविल्यास खात्याचे अधिकारी थेट तिथे जाऊन कारवाई करतात.

तक्रारदाराचे नाव गुप्त

एखाद्या ग्राहकाने एखाद्या व्यापाच्याविरुद्ध वजन व मापे खात्याकडे तक्रारी केल्यास त्याचे नाव गुपित ठेवले जाते. तक्रारीबद्दलचा संशय कोणालाही कळू दिला जात नाही.

तक्रार कोठे कराल?

वजन व मापे खात्याच्या केंद्रीय कार्यालयात ग्राहक दूरध्वनीवरून तक्रार करू शकतात किंवा खात्याच्या संकेतस्थळावर तक्रारी पाठवू शकतात. त्याशिवाय विभागीय कार्यालय किंवा खात्याच्या अधिकाऱ्यांकडे मोबाइलवरही तक्रारी करू शकतात.

कर्मचारी नेहमी दक्ष असतात

वजन व मापे खात्याचे कर्मचारी नेहमी दक्ष असतात. व्यापायांनी ग्राहकांची फसवणूक करू नये हेच त्यांचे धोरण असते. जर वजन मापात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी खात्याकडे आल्यास खात्याचे पथक वेळीच त्यांच्यावर कारवाई करतात. दरवर्षी शंभरहून अधिक व्यापाऱ्यांवर कारवाई केल्याची प्रकरणे नोंद होतात. - नितीन पुरुशान, उपनियंत्रक, वजन व मापे, मडगाव

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: action against as many as 60 people in south goa market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा