कळंगुट येथे भिकाऱ्यांवर कारवाई,
By काशिराम म्हांबरे | Published: November 4, 2023 02:59 PM2023-11-04T14:59:51+5:302023-11-04T15:00:01+5:30
कळंगुट पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
काशिराम म्हांबरे
म्हापसा: गोव्यातील पर्यटन हंगामा मार्गी लागण्याच्या वाटेवर असताना प्रसिद्ध अशा कळंगुट आणि बागा किनायावर येणाऱ्या लोकांना तसेच पर्यटकांना त्रास करणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात कळंगुट पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
कळंगुट पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत महिला तसेच लहान मुलांसहित एकूण १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई दरम्यान त्यातील बरेच बेघर असल्याचेही आढळून आले. सर्वांना योग्य प्राधिकारणी समोर उपस्थित करुन भिकारी कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोव्यात खास करुन किनाºयावरील भिकारी वर्ग ही एक मोठी समस्या बनली असल्याचे मत निरीक्षक परेश नाईक यांनी व्यक्त केले.
गोवा हे जागतीक स्तरावर आकर्षक ठरलेले पर्यटनाचे केंद्र आहे. इथे पर्यटक तर मोठ्या संखेने येत असतात पण त्याच सोबत भिकारी सुद्धा स्वताच्या सुरक्षीत आश्रय स्थानासाठी तसेच उदार निर्वाहासाठी योग्य ठिकाणाचा विचार करुन या परिसरात आकर्षीले जातात. ज्यातून ते लोकांना तसेच पर्यटकांना त्रास करतात असे नाईक म्हणाले. पोलिसांनी सुरु केलेली ही मोहिम पुढेही सुरुच ठेवली जाणार अशी माहिती निरीक्षकांनी यावेळी दिली.