कळंगुट येथे दलालांवर कारवाई
By काशिराम म्हांबरे | Published: June 10, 2023 05:48 PM2023-06-10T17:48:54+5:302023-06-10T17:49:16+5:30
आठवडाभरापूर्वी सुमारे ३४ दलालांवर कारवाई करण्यात आलेली.
म्हापसा: कळंगुट परिसरातील पर्यटकांना विविध आमिषे दाखवून त्यांना कथितरित्या लुटणाऱ्या २१ दलालांवर कारवाई करून त्यांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. पर्यटन व्यापार अधिनियम १९८२ च्या कलमांतर्गत ही कारवाई करुन गुन्हा दाखल केल्याची माहिती निरीक्षक परेश नाईक यांनी दिली. आठवडाभरापूर्वी सुमारे ३४ दलालांवर कारवाई करण्यात आलेली.
दलालांवर कारवाई सुरुच ठेवण्याचा इशारा नाईक यांनी दिलेला. दिलेल्या इशाऱ्यानंतर अद्यापपर्यंत सुमारे ५५ दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दलाल अधिकतर बाहेरील राज्यांतील आहेत, असे निरीक्षक म्हणाले. वरिष्ठांच्या मार्ग दर्शनावर ही कारवाई हाती घेण्यात आली.
सध्या दलालांचा डेटाबेस तयार करण्याचे काम पोलिसांच्या वतिने हाती घेण्यात आले आहे. कारवाई होणाऱ्या संशयितास पहिल्या वेळीस ५ हजार रुपयांचा दंड. दुसऱ्या वेळेस ५० हजार रुपये व त्यानंतर संशयितास शिक्षा किंवा कारावास होऊ शकतो.