सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून कारवाई; रोहन खंवटे यांचा इशारा

By किशोर कुबल | Published: December 14, 2023 03:23 PM2023-12-14T15:23:55+5:302023-12-14T15:24:03+5:30

खंवटे म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून गोव्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

Action by registering crimes against those defaming Goa on social media; Warning by Rohan Khanwate | सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून कारवाई; रोहन खंवटे यांचा इशारा

सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून कारवाई; रोहन खंवटे यांचा इशारा

पणजी : सोशल मीडियावर गोव्याची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईल, असा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे. 

गोवा हे कॅसिनो, वेश्या व्यवसाय, ड्रग्सचे ठिकाण असल्याचे व येथे वाईट प्रवृत्ती असल्याची बदनामी करणारे पोस्ट,  व्हिडिओ अलीकडे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टाकले जाऊ लागले आहेत. काहीजण पैसे घेऊन तर काही टीआरपी वाढवण्यासाठी हे कृत्य करीत असावेत. त्यांचा मी निषेध करतो, असे पर्यटनमंत्री म्हणाले.

अशा व्हिडिओंमुळे लोकांच्या भावना दुखावतात. खंवटे म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून गोव्यासमोर अनेक आव्हाने आहेत. दलालांवर कारवाई करण्यासाठी कोणतीही कसूर सरकारने ठेवलेले नाही. १३६४ क्रमांकाच्या हेल्पलाइनवर तक्रार आल्यास तात्काळ कारवाई केली जाते. येत्या आठवड्यात 'बीच व्हिजिल ॲप' जनतेसाठी आम्ही खुले करणार आहोत. या ॲपवरही स्थानिक किंवा पर्यटक तक्रार करू शकतील व पोलीस तात्काळ कारवाई करतील आणि जर कारवाई केली नाही तर  संबंधित स्थानकाचा पोलीस अधिकारी जबाबदार राहील.' सलल मीडियावरील बदनामीच्या प्रकरणात आयटी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. हा कायदा केंद्राचा आहे. आम्ही आमच्या सूचना केंद्राला पाठवलेल्या आहेत.

'किनारी भागात गस्तीसाठी पोलिसांची संख्या दुप्पट हवी'
किनारी भागात गस्तीसाठी पोलिसांची संख्या दुप्पट करावी ,असे गेल्या आठवड्यात डीजीपींकडे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसे निर्देशही दिले आहेत. परंतु अजून किनाऱ्यांवरील  पोलिसांची संख्या वाढलेली नाही. ती का वाढली नाही?, हे तुम्ही डीजीपींनाच विचारा असे एका प्रश्नावर खंवटे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पर्यटन खाते, पोलीस पर्यटकांना आवश्यक सुविधा सुरक्षा देण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Action by registering crimes against those defaming Goa on social media; Warning by Rohan Khanwate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.