कारवारच्या आमदारास समन्स, विशेष तपास पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:46 AM2018-04-09T04:46:07+5:302018-04-09T04:46:07+5:30

गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकमधील कारवार येथील अपक्ष आमदार सतीश सैल यांना समन्स बजावले आहे.

Action court summons, special investigation team action | कारवारच्या आमदारास समन्स, विशेष तपास पथकाची कारवाई

कारवारच्या आमदारास समन्स, विशेष तपास पथकाची कारवाई

googlenewsNext

पणजी : गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) कर्नाटकमधील कारवार येथील अपक्ष आमदार सतीश सैल यांना समन्स बजावले आहे. सोमवारी त्यांना एसआयटीपुढे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
या आमदाराचा खाण घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. विशेषत: बेकायदेशीरपणे खनिज निर्यात प्रकरणात ते गोवा एसआयटीला हवे आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता रायबंदर येथे गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मल्लिकार्जुन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या निर्यातदार कंपनीचे सैल संचालक आहेत.

Web Title: Action court summons, special investigation team action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.