नोक-या विकणा-या कर्मचा-यांवर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:54 PM2019-06-20T22:54:32+5:302019-06-20T22:54:45+5:30
मंत्री, आमदारांची नावे सांगून काहीजण सरकारी नोक-यांची विक्री करतात. काही कर्मचारीही अशा गैरव्यवहारांमध्ये असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पणजी : मंत्री, आमदारांची नावे सांगून काहीजण सरकारी नोक-यांची विक्री करतात. काही कर्मचारीही अशा गैरव्यवहारांमध्ये असल्याच्या तक्रारी येत आहेत. लाचखोर आणि नोक-या विकणा-या कर्मचा-यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी येथे दिला.
मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की प्रशासनाला अजून वेग द्यावा लागेल. प्रशासन सुलभ करावे लागेल. वीस टक्के सरकारी कर्मचारी अजून काम करत नाहीत. त्यांना वठणीवर आणले जाईलच. शिवाय जे कुणी लोकांकडे सरकारी कामांसाठी लाच मागतात, त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले, की सरकारी नोक-यांसाठी काहीजण पैसे मागतात. काहीजण उगाच मंत्री- आमदारांचीही नावे सांगून नोक-या विकू पाहतात. कुणी कुणालाच सरकारी नोक-यांसाठी पैसे देऊ नयेत. कुणी पैसे मागत असतील तर लोकांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार करावी किंवा पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी. गोव्यात नोक-या विकण्याचे प्रकार पूर्णपणो बंद व्हायला हवेत. दोन-तीन सरकारी कर्मचा:यांविरुद्धही गंभीर तक्रार आली आहे. ते नोकरी विकतात अशी तक्रार आहे. सोशल मिडियावर एक व्हीडीओही व्हायरल झाला. संबंधितांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. आम्ही गय करणार नाही.
सोनसोडोवर लक्ष
सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत काही उपाययोजना सुरू आहे काय असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की निश्चितच तोडगा निघेल. आपण आणि उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी या विषयात लक्ष घातले आहे. आम्ही सातत्याने चर्चाही करत आहोत. योग्य त्या दिशेने पाऊले उचलली जात आहेत.
भाजप कार्यकर्ते अस्वस्थ
दरम्यान, विविध मतदारसंघांतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्र्याना मुख्यमंत्री सावंत गुरुवारी भाजपच्या कार्यालयात भेटले. कुंभारजुवे, प्रियोळ, मये, पणजी अशा मतदारसंघातील कार्यकत्र्यानी सरकारी नोक:यांचेही प्रश्न मांडले. आमच्या समर्थकांना नोक:या हव्या आहेत असे कार्यकर्ते म्हणाले. काहीजणांनी पाणी पुरवठा नीट होत नाही. वीज समस्या तीव्र आहे आणि सरकारी कर्मचारी कामे करत नाहीत अशा तक्रारी केल्या. मुख्यमंत्र्यांनी तोडग्याचे आश्वासन दिले. कुंभारजुवेतील भाजप कार्यकत्र्यानी अस्वस्थता व्यक्त केली. कुंभारजुवेत लोकांना कुणी सक्रिय असा वालीच नाही, लोकांनी कुणाकडे जाऊन समस्या मांडाव्यात, प्रश्न कुणाला सांगावे अशी विचारणा काही प्रमुख कार्यकत्र्यानी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याविषयी आपण स्वतंत्रपणो भेटून बोलूया असे मुख्यमंत्र्यांनी कार्यकत्र्याना सांगितले. फेरीबोट सेवेविषयीही कार्यकत्र्यानी तक्रार केली.