कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या मडगावातील हॉटेल्सवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 07:04 PM2019-05-14T19:04:53+5:302019-05-14T19:05:36+5:30
मडगाव मुख्याधिकाऱ्यांचा इशारा : धडक पहाणी मोहिमेत 15 पेक्षा जास्त हॉटेलात सापडला संमिश्र कचरा
मडगाव: गोव्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मडगावातील बहुतेक हॉटेल्स कच:याचे वर्गीकरण न करताच त्याची विल्हेवाट लावतात. यामुळे शहरातील कच:याच्या व्यवस्थापनावर ताण आला आहे. या परिस्थितीत हॉटेल्सनी या पुढे ओला व सुका कचरा वेगळा करुन ठेवला नाही तर त्या हॉटेल्सना सील ठोकण्याचा इशारा मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिला आहे.
मडगाव शहरात दर दिवशी सुमारे शंभर टन कचरा निर्माण होतो. मात्र तो संमिश्र स्वरुपात गोळा केला जातो. यामुळे या कच:यावर प्रक्रिया करताना अडचणी निर्माण होतात. पालिकेकडून वर्गीकृत केलेला कचरा दिला जात नाही म्हणून शहरातील कच:यावर प्रक्रिया करणा:या कंपनीने यापुढे असा कचरा आल्यास आम्ही त्यावर प्रक्रिया करणार नाही असा इशाराही दिला होता.
या पाश्र्र्वभूमीवर मंगळवारी पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी शहरातील हॉटेलाच्या कच:याची पहाणी केली असता अजुनही संमिश्र स्वरुपातच तो एकत्र करुन ठेवला जातो हे सिद्ध झाले.
एका बाजूने मडगावातील रहिवाशांवर कच:याचे वर्गीकरण करण्याची सक्ती केली जात असताना दुस:याबाजूने सर्वात जास्त प्रमाणात कचरा निर्माण करणा:या हॉटेलांकडे मात्र मडगाव पालिकेकडून दुर्लक्ष होते याबद्दल मडगावच्या श्ॉडो कौन्सिलने कानपिचक्या दिल्यानंतर मडगाव पालिकेने त्वरित हालचाल करीत शहरातील हॉटेलांच्या कच:याची पहाणी केली. मडगावातील हॉटेलांनी आपल्या कच:याचे वर्गीकरण करुनच तो सफाई कामगारांकडे द्यावा अशी ताकीद हॉटेल चालकांना देण्यात आली असून यात हयगय केल्यास हॉटेलांना सील ठोकू असा इशारा मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिला.
मडगावातील काही मोठय़ा हॉटेल्ससह सुमारे 15 हॉटेल्सच्या कच:याची मडगाव पालिकेच्या पथकाने पहाणी केली असता, या सर्व हॉटेलांतून वर्गीकृत केलेला कचरा येण्याऐवजी सरमिसळ असलेला कचरा दिला जातो हे लक्षात आल्यानंतर नाईक यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. मडगावातील हॉटेलांनी ओला व सुका कचरा वेगळा करुन ठेवावा. सुका कचरा केवळ मंगळवार व शुक्रवारी उचलण्यात येणार असून ओल्या कच:याची उचल दररोज केली जाईल असे त्यांनी सांगितले.
सिद्धिविनायक नाईक यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्य अभियंते मनोज आर्सेकर, व कनिष्ठ अभियंते मिष्कीता व इतरांनी मंगळवारी ही पहाणी केली. ही तपासणी मोहीम यापुढेही चालू राहील असे नाईक यांनी सांगितले. मडगावात 100 किलोपेक्षा अधिक कचरा तयार करणा:या आस्थापनांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत असे नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्याधिका:यांनी हाती घेतलेल्या या मोहीमेबद्दल शॅडो कौन्सिलने त्यांचे अभिनंदन केले असून आम्ही केलेल्या सुचनांची नाईक यांनी त्वरित दखल घेतली असे शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनी सांगितले. हॉटेलातील कच:याच्या संदर्भात पालिकेने कडक धोरण स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मडगावातील हॉटेलातून दर दिवशी 5 ते 8 टन कचरा निर्माण होतो. या कच:याचे व्यवस्थित वर्गीकरण न केल्यास शहराचे संपूर्ण कचरा व्यवस्थापन कोलमडून पडू शकते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.