कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त विशेष ट्रेन; कधी होणार सुरू? स्थानके कोणती? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:18 IST2025-04-09T12:18:27+5:302025-04-09T12:18:33+5:30

उन्हाळी हंगामातील प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

additional special trains on konkan railway route | कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त विशेष ट्रेन; कधी होणार सुरू? स्थानके कोणती? वाचा

कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त विशेष ट्रेन; कधी होणार सुरू? स्थानके कोणती? वाचा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२ लोकमान्य टिळक (टी) -करमळी-लोकमान्य टिळक (टी) एसी स्पेशल साप्ताहिक धावणार आहे. या विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक (टी) -करमळी एसी स्पेशल साप्ताहिक ११ एप्रिल ते २३ मे रोजीपर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १२ वाजता करमाळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५२ करमळी-लोकमान्य टिळक (टी) एसी स्पेशल साप्ताहिक ही गाडी १२ एप्रिल ते २४ मे रोजीपर्यंत दर शनिवारी करमळी येथून दुपारी २.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ४.०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही २० डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्टेशनवर थांबा घेईल.

 

Web Title: additional special trains on konkan railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.