कोकण रेल्वेच्या होळीसाठी अतिरिक्त गाड्या; रोहा-चिपळून-रोहा मेमू एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 02:37 PM2023-03-02T14:37:04+5:302023-03-02T14:37:48+5:30

कोकण रेल्वे महामंडळाने होळी महोत्सवासाठी काही विशेष अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचे वेळापत्रक तयार केले आहे.

additional trains for konkan railway holi for goa | कोकण रेल्वेच्या होळीसाठी अतिरिक्त गाड्या; रोहा-चिपळून-रोहा मेमू एक्स्प्रेस

कोकण रेल्वेच्या होळीसाठी अतिरिक्त गाड्या; रोहा-चिपळून-रोहा मेमू एक्स्प्रेस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव :कोकण रेल्वे महामंडळाने होळी महोत्सवासाठी काही विशेष अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचे वेळापत्रक तयार केले आहे. २ मार्च ते १२ मार्चपर्यंत या विशेष रेल्वे गाड्या कोकण रेल्वेच्या रुळांवरून लोकांच्या सेवेसाठी धावणार आहेत.

०११८७ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी एक्स्प्रेस ही साप्ताहिक रेल्वे गाडी आठवड्यातून करमळी स्थानकावर पोहोचणार आहे. एक वेळा २ मार्च व ९ मार्चला मुबईहून रात्री १०:१५ वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता तर परतीच्या प्रवासात ०११८८ करमळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष रेल्वे गाडी ३ मार्च व १० मार्चला करमळी रेल्वे स्थानकावरून संध्याकाळी ४:२० वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी ३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचणार आहे.

ही साप्ताहिक रेल्वेगाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी व थिवी स्थानकावर थांबा घेणार आहे. ०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर जंक्शन एक्स्प्रेस ही साप्ताहिक रेल्वे गाडी मुंबईहून ७ मार्च रोजी रात्री १०:१५ वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५:२० वाजता मंगळूर जंक्शनवर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ०११६६ ही साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी मंगळूर जंक्शनवरून ८ मार्च रोजी संध्याकाळी ६:४५ वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: additional trains for konkan railway holi for goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.