गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर २१ पदांची जाहीरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 03:35 PM2024-02-24T15:35:39+5:302024-02-24T15:35:55+5:30

गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कंत्राटी तत्वावर २१ विविध पदांसाठी जाहीरात आली आहे.

Advertisement for 21 posts on contract basis in Goa Medical College | गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर २१ पदांची जाहीरात

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर २१ पदांची जाहीरात

-नारायण गावस 

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कंत्राटी तत्वावर २१ विविध पदांसाठी जाहीरात आली आहे. येत्या २८ फेब्रुवारी राेजी डीन कार्यालयामध्ये दुपारी ३ वा. उमेदवारांची मुलाखत हाेणार आहे. उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे तसेच इतर सर्व दस्ताऐवज घेऊन सकाळी ९.३० वा. हजेरी लावावी दुपारी २.३० नंतर उशीरा हजेरी लावलेल्यांना घेतले जाणार नसल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक प्रशासनाने कळविले आहे. 

या पदामंध्ये कार्डीओलॉजीमध्ये सहाय्यक प्रध्यापक ३ पदे, गॉरियाट्रिक्स विभागामध्ये असोसिएट प्राध्यापक ३ पदे, गॉरियाट्रिक्स विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक १ पद, रक्तपेटीमध्ये चाचणी विभागाचा प्रमुख १ पदे , पॅथोलॉजी विभागात ४ पदे, ट्युटर/ डेमोन्स्ट्रेटर मायक्रो बायोलॉजी विभागात १ पद , ट्युटर/ डेमोन्स्ट्रेटर फिजीओलॉजी विभागात ३ पदे , जनरल सर्जरी विभागात व्याख्याता २ पदे , बायोकेमिस्ट्री विभागात रेसिड्न्ट बायोकेमिस्ट २ पदे , रेडियोडायग्नोस्टिक विभागात इंटरवेन्शनल रेडिओलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापक १ पद आणि इम्युनो हेमोटोलॉजी व ब्लड ट्रान्स्फ्यूजन विभागात व्यख्याता २ पदे अशी एकूण २१ पदांसाठी ही जाहीरात आली आहे.

गोवा आराेग्य खाते तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात माेठ्या प्रमाणात कंत्राट तत्वावर जाहीराती या अगोदर आलेल्या आहेत. आता सरकारी कायमस्वरुपी पदे ही कर्मचारी भरती आयाेगामार्फत भरली जाणार आहे. त्यासाठी काही खात्यांकडून जाहीराती आल्या असून आता लाेकसभेच्या निवडणूकांची आचारसंहीता लागणार असल्याने ही प्रक्रिया पुढे गेली आहे. पण अनेक खात्यांमध्ये सध्या कंत्राटी तत्वावर पदे भरली जात आहेत. त्यांच्या थेट मुलाखती घेतल्या जात आहेत.

Web Title: Advertisement for 21 posts on contract basis in Goa Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा