गाेवा क्रीडा प्राधिकरणात ५५ पदांसाठी जाहीरात; अर्ज 'या' तारखेपर्यंत करा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 02:30 PM2024-02-28T14:30:33+5:302024-02-28T14:32:21+5:30
गाेवा क्रीडा प्राधिकरण या गोवा सरकारच्या स्वायत्त संस्थेमध्ये नियमित तत्वावर गट ‘सी’ पदे भरण्यातीकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत.
नारायण गावस
पणजी: गाेवा क्रीडा प्राधिकरण या गोवा सरकारच्या स्वायत्त संस्थेमध्ये नियमित तत्वावर गट ‘सी’ पदे भरण्यातीकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत. यात सहाय्यक व्यवस्थापक (संकुल) १, सहाय्यक व्यवस्थापक (जलतरण तलाव) २, प्रशिक्षक ७, कनिष्ठ वर्ग लिपीक (एलडीसी) ४, प्रकल्प चालक २, जीवरक्षक १, बहुकार्मिक कर्मचारी ( मल्टिटास्किंग स्टाफ) ३८ अशी एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांसाठी एकूण १८,००० ते ३५,४०० पर्यंत वेतन दिले जाणार आहे.
प्रशिक्षक पदाकरता वय ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. सहाय्यक व्यवस्थापक (संकुल), सहाय्यक व्यवस्थापक (जलतरण तलाव), एलडीसी, प्रकल्प चालक, जीवरक्षक आणि एमटीएस याकरिता वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (गोवा क्रीडा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि शासकीय कर्मचाऱ्यांकरिता शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचना आणि आदेशांना अनुसरून ५ वर्षांची शिथिलता).
आवश्यक पात्रता असणाऱ्या आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज, सोबत जन्म प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, रोजगार विनिमय पत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शिक्षणेतर क्रियाकलापप्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) इ. यांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडून कार्यकारी संचालक, गोवा क्रीडा प्राधिकरण, पहिला मजला, ॲथलेटिक स्टेडियम, कुजिरा, बांबोळी यांच्या कार्यालयात दि. १५ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावे. पदांची सविस्तर माहिती आणि कामाचा तपशील, अर्जाचा नमुना यासाठी कृपया एसएजी यांचे संकेतस्थळ : www.tsag.org_यास भेट द्यावी, असे गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे कळविण्यात आले आहे.