एएफसीचे सामने गुरुवारपासून

By admin | Published: September 12, 2016 03:51 AM2016-09-12T03:51:25+5:302016-09-12T03:51:25+5:30

१५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या १७ व्या १६ वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषकातील सामने गोमंतकीयांना मोफत पाहता येणार आहे.

From AFC to Thursday | एएफसीचे सामने गुरुवारपासून

एएफसीचे सामने गुरुवारपासून

Next

पणजी : येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या १७ व्या १६ वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषकातील सामने गोमंतकीयांना मोफत पाहता येणार आहे. स्थानिक आयोजक समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेत एकूण १६ देशांतील संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील सामने मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील जीएमसी मैदानावर होतील. भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध संध्याकाळी ७ वाजल्यापासून फातोर्डा स्टेडियमवर खेळविण्यात येईल. या सामन्यसाठी चाहत्यांना http://preprod.get2thegames.com/ या संकेतस्थळावरून नावनोंदणी करून तिकिटे मिळवावी लागतील.
ही तिकिटे स्टेडिमय काउंटरवर मोफत असतील. या संदर्भात, स्पर्धा संचालक जेवियर सिप्पी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा पाहण्यासाठी गोमंतकीय चाहते उत्साहीत असतील याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही मोफत सामने पाहण्याची सोय केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आगामी २०१७ च्या विश्वचषकाची ही रंगीत तालीम असेल, त्यामुळे या स्पर्धेबाबतही उत्सुकता वाढावी, हा आमचा उद्देश आहे.
यजमान भारतीय संघ या स्पर्धेत युएई, सौदी अरेबिया आणि इराणच्या गटात असून भारताचे सामने अनुक्रमे १५, १८ आणि २१ रोजी आहेत. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक निकोलई अ‍ॅडम यांनी खूप मेहनत घेतली असून संघ आशावादी आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

भारतीय संघ
गोलरक्षक : धीरज सिंग, प्रभसुखन सिंग गिल, मोहम्मद नवाझ.
बचावपटू : बोरीस सिंग थांगजाम, जितेंद्र सिंग, मोहम्मद सारिफ खान, मोहम्मद राकिप, गॅस्टन डिसिल्वा, नरेंदर.
मध्यरक्षक : संजीव स्टॅलीन, सुरेश सिंग वांगजाम, खुमंथेम मितई, अमरजित सिंग कियाम, कोमल थाटल, अनिकेत अनिल जाधव, लालेंगमाविया, सौरभ मेहर.
आक्रमक : अमन छेत्री, राहुल केन्नोळी प्रवीण, नोंगबा सिंग अकोजाम.
स्पर्धेतील गट
अ : भारत, इराण, सौदी अरेबिया, यूएई.
ब : आॅस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, कझाकिस्तान.
क : कोरिया प्रजासत्ताक, मलेशिया, ओमान, इराक.
ड : डीपीआर कोरिया, उजबेकिस्तान, थायलंड व येमन.

Web Title: From AFC to Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.