ती चाचणी विश्वासार्ह नव्हती फॉर्मेलीन प्रकरणात सरकारचे प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 09:46 PM2018-09-04T21:46:37+5:302018-09-04T21:46:57+5:30

 घावूक मासळी बाजारात मासळीची केलेली चाचणी ही विश्वासार्ह चाचणी नव्हती अशी भूमिका सरकारने न्यायालयात घेतली आहे.

The affidavit of the Goa government in Court | ती चाचणी विश्वासार्ह नव्हती फॉर्मेलीन प्रकरणात सरकारचे प्रतिज्ञापत्र

ती चाचणी विश्वासार्ह नव्हती फॉर्मेलीन प्रकरणात सरकारचे प्रतिज्ञापत्र

Next

पणजी - घावूक मासळी बाजारात मासळीची केलेली चाचणी ही विश्वासार्ह चाचणी नव्हती अशी भूमिका सरकारने न्यायालयात घेतली आहे. गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलीनयुक्त नसल्याचे सरकारचे सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
 फॉर्मेलीनयुक्त मासळी  प्रकरणात खंडपीठाने हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका शिवराज कामत तारकर, विठ्ठळ नाईल आणि वाल्मिकी नायक यांनी दाखल केल्या होत्या. सर्व तिन्हीही याचिका एकत्रीत करून खंडपीठाने सुनावणी सुरू केली आहे. या प्रकरणात खंडपीठाने सरकारला नोटीस बजावून स्पष्टीकरण देण्याची सूचना केली होती. सरकारकडून मंगळवारी या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर केले. 
गोव्यात येणाऱ्या मासळीची चाचणी 2015 पासून घेतली जात असून आतापर्यंत 2 हजार ट्रक्सची चाचणी घेण्यात आली आहे असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या प्रकरणात खंडपीठाने अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरणला (एफएसएसएआय) नोटीस बजावली असून प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

Web Title: The affidavit of the Goa government in Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.