युवकाच्या मृत्यूनंतर हॉस्पिसिओत रणकंदन

By admin | Published: August 27, 2015 02:13 AM2015-08-27T02:13:46+5:302015-08-27T02:13:57+5:30

मडगाव : छातीत दुखत असल्याने उपचारासाठी हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल केलेल्या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने खवळलेल्या त्याच्या मित्रांनी हॉस्पिसिओ

After the death of the youngster, the Hospisioat trumpet | युवकाच्या मृत्यूनंतर हॉस्पिसिओत रणकंदन

युवकाच्या मृत्यूनंतर हॉस्पिसिओत रणकंदन

Next

मडगाव : छातीत दुखत असल्याने उपचारासाठी हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल केलेल्या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने खवळलेल्या त्याच्या मित्रांनी हॉस्पिसिओ इस्पितळात रणकंदन केले. डॉक्टरांनी उपचार करण्याची तसदी न घेतल्याने आपला मित्र मरण पावल्याचा दावा करत या युवकांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनची तावदाने फोडली व खुर्च्यांचीही मोडतोड केली. त्यानंतर मुख्य रस्त्यावर ठाण मांडून वाहतूकही अडवून धरली. खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिसिओच्या आवाराबाहेर पोलीस तैनात करण्यात
आले होते.
अकबर गाझी असे मयताचे नाव असून तो कोलवा येथील रहिवासी आहे. मयत कुडतरी येथे जीम इन्स्ट्रक्टर म्हणून व्यवसाय करत होता. हॉस्पिसिओत दाखल झाल्यानंतर आपण दुसऱ्या एका खासगी इस्पितळात उपचार करण्यासाठी जात असल्याचे सांगून (पान २ वर)

Web Title: After the death of the youngster, the Hospisioat trumpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.