पोटभर खाऊन हॉटेलात झोपला अन् चोरटा तावडीत सापडला!

By काशिराम म्हांबरे | Published: December 19, 2023 04:56 PM2023-12-19T16:56:10+5:302023-12-19T16:57:11+5:30

थकलेला चोर शेवटी हॉटेलात झोपी गेला अन् पोलिसांच्या तावडीत सापडल्याचा प्रकार येथील बाजारपेठेत घडला आहे.

After eating and sleeping in the hotel the thief was caught | पोटभर खाऊन हॉटेलात झोपला अन् चोरटा तावडीत सापडला!

पोटभर खाऊन हॉटेलात झोपला अन् चोरटा तावडीत सापडला!

म्हापसा: चोरी करण्याच्या उद्देशाने हॉटेलात शिरल्यानंतर चोरीसाठी हाती काहीच लागले नसल्याने पोटभर खाऊन, काऊंटर जाळून थकलेला चोर शेवटी त्याच हॉटेलात झोपी गेला अन् पोलिसांच्या तावडीत सापडल्याचा प्रकार येथील बाजारपेठेत घडला आहे. दोन दिवसापूर्वी बाजारातील इतर काही हॉटेलात चोरट्याने चोरी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या अंदाजाला उघडकीस आला. हरिहर दास ( १८ वय, बिहार ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

चोरट्याने बाजारात असलेल्या एका हॉटेलला लागून असलेल्या ब्युटी पार्लरात सर्वात प्रथम चोरीच्या उद्देशाने त्यात टेरेसवरील पाण्याच्या टाकीवरून प्रवेश केला. तिथे चोरी करण्यासारखी एकही वस्तू त्याच्या हाती लागू शकली नाही. रागाच्या भरात त्यांनी पार्लरमधील वस्तूंची नासधूस करून आग लावून नुकसान केली. नंतर तेथील माळ्यावरून दुसऱ्या बाजूला असलेल्या हॉटेलात शिरला. पोटाची भूक भागवण्यासाठी हॉटेलातील खाद्य पदार्थावर मनसोक्त ताव मारला. लहर आली म्हणून सिगारेट्स ओढल्या व नंतर चोरीच्या उद्येशाने काऊंटरकडे वळला. पण काऊंटरमध्ये काही नसल्याने त्यालाही आग लावली. मात्र आग लावल्यानंतर तेथेच त्याला झोप लागल्याने हॉटेलातच झोपी गेला. 

सकाळी कामगारांनी हॉटेल उघडतास घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. चोराला पकडून कामगारांनी त्याला चोप दिला. नंतर मालक स्वप्नील पेडणेकर यांनी पोलिसांना बोलावून चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान दोन दिवसापूर्वी इतरही हॉटेलात चोरीचा प्रयत्न त्या चोरट्याकडून करण्यात आला होता. त्यावेळी काही रोकड त्याच्या हाती लागली होती.

Web Title: After eating and sleeping in the hotel the thief was caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.