मुंबई- गोवा बोटसेवा पावसाळ्यानंतर - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 11:21 AM2018-06-12T11:21:35+5:302018-06-12T11:21:35+5:30
मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे आजारी असले तरी गोव्यातील विकास कामांवर परिणाम झालेला नाही, अन्य मंत्री सक्षमपणो काम करत आहेत, असा दावा गडकरी यांनी केला.
पणजी : मुंबई ते गोवा अशी प्रवासी बोटसेवा आताच सुरू होणार होती पण पावसाळा सुरू झाल्यामुळे दोन महिन्यांचा विलंब लागला आहे. पावसाळ्य़ानंतर ही बोटसेवा सुरू होईल, असे केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्रलयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. मंत्री गडकरी म्हणाले, की गोवा- मुंबई जलमार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बोट चालवून पाहिली गेली आहे. प्रयोग नुकताच पूर्ण झाला आहे. आता पावसात काही करता येत नाही. पावसाळ्य़ानंतर पूर्णपणो जलवाहतूक सुरू होईल.
गोव्यातील मांडवी नदीवरील तिस:या पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गडकरी पणजीत आले होते. त्यांच्या हस्ते मांडवी नदीवरील पुलाच्या शेवटच्या भागाचे काम पूर्ण केले गेले. गोव्याचे बांधकाम व नदी परिवहन मंत्री सुदिन ढवळीकर हेही यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, की मुंबईत केंद्र सरकार मोठय़ा क्रुझ टर्मिनलचे बांधकाम करत आहोत. सध्या सुमारे 8क् पर्यटक बोटी मुंबईत येतात. गोव्यातही साठ- सत्तर जहाजे येत असतील. गोव्यातही छोटे क्रुझ टर्मिनल बांधले गेले आहे. मुंबईतील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षात एकूण साडेनऊशे पर्यटक जहाजे मुंबईत येतील. मुंबईहून बोटीद्वारेच अंदमान निकोबार, मालदिव, सिंगापुर, बाली आदी ठिकाणी जाण्याची सोय करता येईल.
मंत्री गडकरी म्हणाले, की गोव्यात मोपा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून होण्यापूर्वी येथील जलमार्ग विमानतळाशी जोडता येतील काय याचे सव्रेक्षण करण्याची सूचना मी राज्य सरकारला केली आहे. म्हणजे विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर हॉटेलमध्ये रस्त्याने न जाता हे प्रवासी जहाजातून जाऊ शकतील. व्हीनसप्रमाणो गोव्यातही करता येईल. गोव्यातील बंदर कप्तान खात्याच्या प्रमुख अधिका:याकडून विविध प्रकारचे प्रश्न प्रत्येक प्रकल्पासाठी उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे एखादी जेटी बांधून झाली तरी, त्या जेटीचा प्रवासी वर्गासाठी वापर करण्याकरिता विलंब होतो. जेटीच्या वापरासाठी देखील केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाचा दाखला हवा, असे बंदर कप्तान खात्याचे अधिकारी म्हणतात. विकास कामांसाठी गोव्याच्या प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे आजारी असले तरी गोव्यातील विकास कामांवर परिणाम झालेला नाही, अन्य मंत्री सक्षमपणो काम करत आहेत, असा दावा गडकरी यांनी केला.