गोवा लोकायुक्तांच्या अहवालानंतर राजकारण्यांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 01:00 PM2018-06-07T13:00:59+5:302018-06-07T13:00:59+5:30

गोव्यातील आजी-माजी महापौर, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच सदस्य अशा अनेकांनी स्वत:च्या मालमत्तेची माहिती मागूनदेखील दिली नाही, असे जाहीर करणारा अहवाल गोव्याच्या लोकायुक्तांनी उघड केल्यानंतर गोव्यात स्थानिक पातळीवरील हॅवीवेट राजकारण्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

After the Goa Lokayuktas report, the stushie among politicians | गोवा लोकायुक्तांच्या अहवालानंतर राजकारण्यांमध्ये खळबळ

गोवा लोकायुक्तांच्या अहवालानंतर राजकारण्यांमध्ये खळबळ

Next

पणजी : गोव्यातील आजी-माजी महापौर, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच सदस्य अशा अनेकांनी स्वत:च्या मालमत्तेची माहिती मागूनदेखील दिली नाही, असे जाहीर करणारा अहवाल गोव्याच्या लोकायुक्तांनी उघड केल्यानंतर गोव्यात स्थानिक पातळीवरील हॅवीवेट राजकारण्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 2016 साली कुणी मालमत्तेची माहिती लोकायुक्त कायद्यानुसार आपल्याला दिली नाही हे लोकायुक्तांनी नावासह जाहीर केले आहे. त्यांनी राज्यपालांनाही अहवाल सादर केला आहे. हा अहवाल गोवा लोकायुक्त कायद्यानुसार यापुढे गोवा विधानसभेसमोर ठेवला जाणार आहे. लोकायुक्तांनी सर्व प्रसार माध्यमांच्या कार्यालयातही अहवाल पाठवून दिला. यामुळे ज्यांनी मालमत्तेची माहिती 2016 साली दिली नाही त्यांची नावे जगजाहीर झाली. यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारण्यांमध्ये धावपळ उडाली आहे. या राजकारण्यांमध्ये सर्वपक्षीय राजकारण्यांचा समावेश आहे. पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्यासह माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, शुभम चोडणकर, नगरसेवक उदय मडकईकर, लता पारेख, अस्मिता केरकर, राहुल लोटलीकर, रुथ फुर्तादो, रेश्मा करिशेट्टी, शीतल नाईक, मिनिन डिक्रुज, रुपेश हळर्णकर, आरती हळर्णकर, वसंत आगशीकर व अन्य अनेक नगरसेवकांची नावे महापौरांनी जाहीर केली आहेत. 

साखळी शहराचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, म्हापशाचे नगराध्यक्ष रोहन कवळेकर, मडगावच्या नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई, माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, डॉ. राधिका नायक यांचीही नावे लोकायुक्तांनी आपल्या अहवालातून जाहीर केली आहेत. या शिवाय आजी-माजी नगरसेवक दया पागी, सुनील देसाई, राजू शिरोडकर, रुपेश महात्मे, पुंडलिक फळारी, सुचिता मळकण्रेकर, राऊल परैरा, मानुएल कुलासो, अजित बिज्रे, सैफुल्ला कान, क्रितेश नाईक गावकर, भावना भोसले, संदेश मेस्ता, पास्कोल डिसोझा अशी अनेक प्रसिद्ध नगरसेवकांची नावे लोकायुक्तांनी उघड केली आहेत. काहीजणांनी 2017 साली मालमत्तेची माहिती लोकायुक्तांना दिली पण गोवा लोकायुक्त कायद्यानुसार दरवर्षी माहिती देणो लोकायुक्तांना अपेक्षित आहे. ज्यांनी 2016 साली मालमत्ता लपवली त्यांचीच नावे लोकायुक्तांनी उघड केली, असे लोकायुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. स्थानिक राजकारण्यांना दोन महिन्यांचा कालावधी लोकायुक्तांनी दिला होता.

गोव्यात एकूण दोन जिल्हा पंचायती असून त्यांच्या सदस्यांची एकूण संख्या 50 आहे. यापैकी एकवीसजणांनी मालमत्तेची माहिती दिली नाही. त्यात रुपेश नाईक, धाकू मडकईकर, संदीप वेण्रेकर, दत्तप्रसाद दाभोळकर, संजय शेटय़े, सिडनी ब्रोटो, वैशाली सातार्डेकर, तुकाराम हरमलकर, वासूदेव कोरगावकर, गुपेश नाईक, मिनाक्षी गावकर, गिल्बर्ट रॉड्रीग्ज, फटी गावकर, प्रेमनाथ हजारे, महिमा देसाई, शुभेच्छा गावस अशा नावांचा समावेश आहे. लोकायुक्तांनी एक हजारपेक्षा जास्त पंच, सरपंच, उपसरपंच आदींची नावे जाहीर केली आहेत.

Web Title: After the Goa Lokayuktas report, the stushie among politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.