बाजारात आंब्यानंतर आता फणसाची आवक वाढली! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 03:16 PM2024-05-01T15:16:44+5:302024-05-01T15:17:54+5:30

शहरी भागासारखी ग्रामीण भागात मात्र फणसाला तेवढी मागणी नाही.

After mango in the market, the arrival of jackfruit has increased! | बाजारात आंब्यानंतर आता फणसाची आवक वाढली! 

बाजारात आंब्यानंतर आता फणसाची आवक वाढली! 

- नारायण गावस

पणजी : राज्यात आता आंब्याप्रमाणे फणसाची आवक वाढली आहे. पण आंब्या सारकी फणसाला मागणी नाही तरी पणजी मार्केटमध्ये मोठ्या आकाराचा कापा फणस आता ४०० ते ५०० रपये एक विकला जात आहे तर काप्या फणसाचे साफ करुन काढलेले गरे १०० रुपयांना विकले जात आहे. पण शहरी भागासारखी ग्रामीण भागात मात्र फणसाला तेवढी मागणी नाही.

राज्यात आंब्या प्रमाणे फणसाच्या बागा आहेत, पण फणसाला आंब्यासारखी मागणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील मोठी फणसाची झाडे कापून टाकली आहे. काही मोजकीच फणसाची आहेत. सत्तरी, काणकोण, केपे ,फोंडा, पेडणे अशा काही तालुक्यामध्ये डोंगराळ भागात फणसाची मोठी झाडे आहेत. आताचे युवक फणसाचे गरे जास्त खात नसल्याने  कुणालाही  फणस नको आहे. पण शहरी भागात अजूनही काही लोक फणसाचे गरे आवडीने खातात म्हणून मार्केटमध्ये फणसाला मोठी मागणी आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फणस कुजून वाया जात आहेत. आता मे ते जून पर्यंत दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात फणसांची आवक वाढणार आहे. आता रसाळ तसेच कापे फणस मोठ्या प्रमाणात बाजारात यायला सुरवात होणार आहे. गावागावान तर फणसाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात रसाळ फणस कुजत पडलेले आम्हाला पहायला मिळतात. या रसाळ फणसांना काहीच मागणी नसते. 

फणसापासून अनेक खाद्य वस्तू
आता फणसाला जास्त  मागणी नसल्याने कृषी खाते तसेच कृषी खात्याच्या आत्मा या संस्थेमार्फत  फणसापासून विविध पदार्थ  बनविण्याचे  प्रशिक्षण महिलांना दिली जात आहे. मागील काही वर्षापासून सुरु केले आहे. गोवा जैवविविधता मंडळही असे फणसापासून फणसाचे चिप्स, त्याचप्रमाणे फणसाचे पापड, फणसाचा ज्यूस तसेच फणसाचे मिठाई व  इतर विविध गोड पदार्थ बनविले जातात त्यांना मागणीही असते.

Web Title: After mango in the market, the arrival of jackfruit has increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा