मनोहर पर्रीकरांनंतर प्रमोद सावंतच माझे नेते: सुभाष फळदेसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 10:42 AM2024-05-14T10:42:47+5:302024-05-14T10:43:29+5:30
एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सासष्टीत भाजपची मते यावेळी वाढतील असा दावा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पर्रीकर यांच्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच माझे नेते आहेत. लोकांनी त्यांना स्वीकारलेले आहे. ते एक उभरते नेते असून, या निवडणुकीत दक्षिण गोव्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नेते आवश्यक ती उंची गाठली आहे, असे समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.
एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सासष्टीत भाजपची मते यावेळी वाढतील असा दावा केला. आमचे आमदार तेथे आहेत, त्यामुळे ती आमची जमेची बाजू आहे, असे ते म्हणाले.
फळदेसाई म्हणाले की, सावंत यांच्याकडे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कसब आहे. गर्दीतही ते आबालवृद्धांकडे जातात. त्यांची विचारपूस करतात. पर्रीकर यांच्यानंतर त्यांनी नेते म्हणून लोकांच्या मनात घर केले आहे.
...तो विषय आता संपलाय
माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व त्यांची पत्नी सावित्री यांच्याकडे झालेल्या वादासंबंधी विचारले असता फळदेसाई म्हणाले की, कवळेकर यांना लक्ष्य लक्ष्य बनविण्याचा बनविण्याच्या माझा मुळीच हेतू नव्हता. मी तो विषय संपलेला आहे. या विषयात मला आणखी तेल ओतायचे नाही. परंतु एक मात्र खरे की गेली दोन वर्षे सावित्री यांचे सांगेत काहीच काम दिसत नाही. त्यांचा सांगेत संपर्कही नाही. बाबू किंवा सावित्री यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे मी कुठेही म्हटलेले नाही. बाबूंच्या टीममधील काही जणांनी काँग्रेस उमेदवारासाठी काम केले एवढेच मी म्हणालो होतो.
कुंकळ्ळीत मताधिक्क्य वाढेल
दरम्यान, सासष्टी तालुक्यात भाजपची मते वाढणार असा दावा करताना कुंकळ्ळी मतदारसंघात काँग्रेसचे मताधिक्य कमी होईल, असेही ते म्हणाले. कुंकळ्ळीत सध्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे आमदार आहेत.