पणजीनंतर आता रायबंदरवासिय स्मार्ट सिटीच्या कामाने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 04:06 PM2024-04-12T16:06:09+5:302024-04-12T16:07:43+5:30
रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत.
नारायण गावस, पणजी:स्मार्ट सिटीच्या कामाने पणजी लोक गेली अनेक वर्षे त्रास सहन करत आहेत. आता रायबंदरमध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने या भागातील नागरिक या कामाने त्रस्त झाले आहेत. गेले वर्ष होत आले या भागातील सांडपाण्याची पाईपलाईन ाघालण्यासाठी खाेदकाम सुरु आहे. त्यामुळे येथे ठिकठिकाणी कठडे घालण्यात आले असून मोठ्या वाहनांना बंदी घातली आहे. रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत.
कठडे घालण्यात आल्याने गाड्या घरी नेताना त्रास होत आहे. तसेच बाहेर जाताना धुरळाचा सामना करावा लागतो. घरात सर्वत्र मातीचा धूरळ परसला आहे. गेले वर्ष होत आले या ठिकाणी खोदकाम सुरु आहे. पण काम संथगतीने सुरु असल्याने सर्वांना त्रास हाेत आहे. असे आता रायबंदरवासिय लोक म्हणतात. लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन रस्ता सुरळीत करावा अशी मागणी आता आता रायबंदरवासियांकडून केली जात आहे.
रायबंदराचे रहिवाशी मायकल डायस म्हणाले, गेले अनेक महिने सुरु असलेल्या या कामाचा आम्हाला आता कटाळा आला आहे. घरामध्ये सर्वत्र धूरळ पसरली आहे. अगोदरच रस्ता अरुंद त्यात हे बांधकाम असल्याने आता दुचाकी नेतानाही त्रास होता आहे. आम्हाला मोठ्या गाड्या घरी आणता येत नाही. ठिकठिकाणी कठडे घातले आहेत. धूरळावर वेळेत पाणी मारले जात नाही. तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी लक्ष घालत नसल्याने याचा फटका आम्हाला बसला आहे.
ॲड. आयरिश रॉड्रिग्ज म्हणाले, रायबंदर येथील रस्ते खोदण्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. कधीही न संपणाऱ्या अनियोजित आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या स्मार्ट सिटी कामांमुळे अडकलेल्या रहिवाशांसह धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले असून आरोग्य आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आमच्या रहिवाशांच्या आरोग्याशी तडजोड केली जात असल्याने ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सध्या सुरू असलेल्या कामांचे भवितव्य काय असेल हे कोणालाच माहीत नसताना सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या तथाकथित विकासकामांच्या गुणवत्तेची हमी स्वत: अधिकारी देऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे.