गोव्यातून पळालेला लफंगा ६ वर्षांनी ठाण्यात जेरबंद  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 09:01 PM2018-06-24T21:01:42+5:302018-06-24T21:21:12+5:30

एमएस शायन या मल्टिट्रेड कंपनीकडून झालेल्या ३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात  ६ वर्षे बेपत्ता असलेला अानंद तांबे याला गोवा पोलिसांनी महाराष्ट्रात ठाणे येथे पकडून ताब्यात घेतले.

After six years he arrested from Thane | गोव्यातून पळालेला लफंगा ६ वर्षांनी ठाण्यात जेरबंद  

गोव्यातून पळालेला लफंगा ६ वर्षांनी ठाण्यात जेरबंद  

Next

पणजी  -  एमएस शायन या मल्टिट्रेड कंपनीकडून झालेल्या ३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात  ६ वर्षे बेपत्ता असलेला आनंद तांबे याला गोवा पोलिसांनी महाराष्ट्रात ठाणे येथे पकडून ताब्यात घेतले. त्याच्या फसवणुकीची एकूण संख्या ३ कोटीहून अधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 
संशयित  तांबे हा एमएस शायन या मल्टीट्रेड कंपनीचा प्रतिनिधी होता. त्याने १२९ गुंतवणुकदारांना फसवून एकूण ३ कोटीहून अधिक रक्कम बुडविल्याचा त्याच्यावर ठपका आहे. तो ठाणे येथे असल्याची माहिती गोव पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक प्रज्योत एस फडते यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे पोलीस पथक जाऊन त्याला पकडण्यात आले आणि त्याला गोव्यात घऊन आले. आर्थिक गुन्हा विभागाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तांबे याला रिमांडवर पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस त्याचा आज भरपूर समाचार घेतील. 
अधिक परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे गुंतवणूक करून हे संशयित घत होते. त्यामुळे लोकांननी या संस्थेवर मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक केली होती. लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतर कंपनीचे अधिकारी गाशा गुंडाळून पळाले होते. या प्रकरणात या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अगोदर भूपसिंग भानू, आकाश मत्तिकोप, संजय आमोणकर, शरद शिरोडकर, सुरज फातर्पेकर, शरद शिरोडकर यांना अटक करण्यात आली होती व नंतर त्यांची जामीनवर सुटका झाली होती. मुख्य संशयित तांबे हा तेव्हा बेपत्ता झाला होता तो कधी मिळालाच नाही. तब्बल सहा वर्षांनी त्याला पकडण्यात आले आहे.

Web Title: After six years he arrested from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.