गोव्यातील दोन जलमार्गावर सौर उज्रेवरील फेरीबोटी, कोचीला भेट दिल्यानंतर गोव्याच्या मंत्र्याचे सूतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 08:16 PM2017-11-24T20:16:40+5:302017-11-24T20:16:47+5:30
हळदोणा ते पणजी व्हाया पोंबुर्पा आणि सावर्डे ते पणजी व्हाया शिरोडा अशा दोन मोठय़ा जलमार्गावर सौर उज्रेवर चालणा:या फेरीबोटी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे
पणजी : हळदोणा ते पणजी व्हाया पोंबुर्पा आणि सावर्डे ते पणजी व्हाया शिरोडा अशा दोन मोठय़ा जलमार्गावर सौर उज्रेवर चालणा:या फेरीबोटी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे गोव्याचे नदी परिवहन खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. केरळमधील कोची येथील फेरीबोटीची मंत्री ढवळीकर यांनी पाहणी केली व गोव्याविषयी सूचवोच केले.
गोव्यात सध्या बेती ते पणजी, चोडण ते रायबंदर वगैरे विविध मार्गावर फेरीबोट सेवा आहे. ही फेरीसेवा मोफत आहे. प्रवाशांकडून तिकीट आकारले जात नाही. कोची येथे मंत्री ढवळीकर, अधिकारी मिलिंद भोबे व इतरांनी भेट दिली व तेथील फेरीबोटीमध्ये बसून प्रत्यक्ष अनुभव घेतला. नदी परिवहन खात्याचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. केरळच्या जलवाहतूक खात्याच्या अधिका:यांसोबत ढवळीकर व इतरांची बैठक झाली. मंत्री ढवळीकर यांनी लोकमतला सांगितले, की गोव्यात सौर उज्रेवरील दोन फेरीबोटी प्रथम आणाव्यात असा विचार आहे. त्यासाठीच आम्ही कोचीला भेट दिली. तेथील फेरीबोटमधून प्रवासही केला. तिथे प्रवाशांकडून तिकीट आकारले जाते. गोव्यातही तिकीट आकारावे लागेल.
मंत्री ढवळीकर म्हणाले, की सावर्डेहून पणजीला बसगाडीने येण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा कमी तिकीट फेरीबोटीमध्ये आकारले जाईल. तिस ते पस्तीस रुपये आकारणो योग्य ठरेल. सौर उज्रेवरील फेरीबोटमधून प्रवास केल्यास केवळ एक तासात सावर्डेहून पणजीत पोहचता येईल. शिवाय अपघाताचाही धोका संभवत नाही. सावर्डे ते शिरोडा, बोरी, दुर्भाट, बाणस्तारी, जुनेगोवे, चोडण व पणजी असा प्रवास फेरीबोटीने करता येईल. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे.
ढवळीकर म्हणाले, की हळदोणा ते पणजी अशीही सौर उज्रेवरील फेरीबोट सेवा आम्हाला सुरू करायची आहे. अशा प्रकारच्या पंचाहत्तर आसनांच्या एका बोटीच्या निर्मितीवर एकूण सुमारे सव्वा दोन कोटी ते अडिच कोटी रुपयांचा खर्च येतो. ताशी चाळीस किलोमीटर वेगाने फेरीबोट धावू शकते. जेवढा वेग वाढविला जातो, तेवढी सौर उर्जा जास्त लागते. गोव्यात या फेरीबोटींचा प्रयोग सरकार करून पाहील. फक्त सध्याप्रमाणो मोफत प्रवास करता येणार नाही.