इंग्रजी शाळांविरुद्ध पुन्हा आंदोलन

By Admin | Published: July 25, 2015 02:57 AM2015-07-25T02:57:48+5:302015-07-25T03:03:02+5:30

पणजी : राज्यातील चर्चशी निगडित डायोसेझन संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिले जाणारे अनुदान तत्काळ बंद केले जावे,

Again the English School Against the Movement | इंग्रजी शाळांविरुद्ध पुन्हा आंदोलन

इंग्रजी शाळांविरुद्ध पुन्हा आंदोलन

googlenewsNext

पणजी : राज्यातील चर्चशी निगडित डायोसेझन संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिले जाणारे अनुदान तत्काळ बंद केले जावे, अशी मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे शुक्रवारी येथे करण्यात आली. चर्र्च संस्था गोव्याच्या शिक्षण क्षेत्रात धार्मिक राजकारण करत असून आम्ही माध्यमप्रश्नी प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही मंचकडून देण्यात आला.
मंचच्या नेत्या शशिकला काकोडकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, उदय भेंब्रे, अरविंद भाटीकर, पुंडलिक नाईक आदींची येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. पर्रीकर सरकारने डायोसेझन संस्थेच्या १३२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती. ती त्यांची चूक होती. पार्सेकर सरकारने ही व्यवस्था त्वरित बंद करावी; कारण ते घटनेविरुद्ध आहे, असे अ‍ॅड. भेंब्रे व इतरांनी सांगितले. आम्ही केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना या विषयाबाबत पत्रही लिहिले आहे. राज्य सरकारने जर अनुदान बंद केले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू; कारण आमची सहनशीलता आता संपली आहे, असे भेंब्रे म्हणाले.
राज्यात चर्च संस्था धार्मिक राजकारण करत आहे. सरकारमधील ख्रिस्ती आमदार दबावाचे राजकारण खेळत आहेत. सर्व इंग्रजी शाळांना अनुदान मागणाऱ्या फोर्स संघटनेच्या मागे चर्च संस्था आहे. भारतीय संस्कृतीविरुद्ध हे कारस्थान आहे, असे भाटीकर म्हणाले. सरकारने अल्पसंख्याकांच्या दबावाखाली येऊ नये. फोर्स संघटनेने हिंसक आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. आम्ही त्या धमकीचा निषेध करतो. आम्ही यापुढे अशा धमक्या खपवून घेणार नाही, असा इशारा भाषा सुरक्षा मंचने दिला. राजसत्ता म्हणजे सर्व काही नव्हे. जनतेची सत्ता ही सर्र्वश्रेष्ठ आहे. आम्ही जनतेच्या बाजूने आहोत. आम्ही सरकारला दिलेली वेळ संपली आहे. आता २०१६ सालच्या शैक्षणिक वर्षापूर्वी सरकारने डायोसेझनच्या शाळांचे अनुदान बंद करावे. आता मराठी-कोकणी शाळांमध्ये मुलांची संख्या वाढत आहे, असे वेलिंगकर यांनी काही शाळांच्या नावांसह सांगितले. आम्ही लवकरच पुढील कृती ठरवू. सरकारने इंग्रजी शाळांना अनुदान देण्याची व्यवस्था कायम करणारे विधेयक आणू नये, असे वेलिंगकर यांनी सांगितले.

Web Title: Again the English School Against the Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.