पक्षांतर केलेल्यांविरुद्ध आंदोलन करू; रिव्होल्युशनरी गोवन्स पुन्हा आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:48 PM2023-07-24T14:48:52+5:302023-07-24T14:49:58+5:30

गणेश चतुर्थीनंतर घरासमोर मांडणार ठिय्या

agitate against defectors revolutionary goans party on the offensive against | पक्षांतर केलेल्यांविरुद्ध आंदोलन करू; रिव्होल्युशनरी गोवन्स पुन्हा आक्रमक 

पक्षांतर केलेल्यांविरुद्ध आंदोलन करू; रिव्होल्युशनरी गोवन्स पुन्हा आक्रमक 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : २०२२च्या निवडणुकीत जे आमदार म्हणून निवडून एका चिन्हावर आले आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात चतुर्थीनंतर आंदोलन केले जाईल. पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या घरासमोर ठाण मांडले जाईल, तसेच वेगवेगळी आंदोलने आणि चळवळ सुरू केली जाईल, अशी माहिती रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी पेडणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरजीचे मनोज परब यांनी पेडणे नियोजित थीम पार्क येथे प्रकल्पाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यासाठी आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकाराने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आरजीने पक्षांतर करणाऱ्या आमदारांविरुद्ध आंदोलन करणार, असा इशारा दिला होता, त्याचे काय झाले, याबाबत विचारणा केल्यावर परब यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

आमदारांचा आवाज का गप्प झाला?

विधानसभेच्या निवडणुकीत पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातून जे उमेदवार उभे राहिले आणि निवडणूक झाल्यानंतर ते आवाज का करीत नाहीत? त्यांचा आवाज गप्प का झाला, असा प्रश्न मनोज परब यांनी उपस्थित केला. पेडणे तालुक्यातील दोन्ही उमेदवार निवडणुका झाल्यानंतर मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास करून केवळ तोंडी नव्हे, तर लेखी स्वरूपात वीज, पाणी, रस्ते या समस्यांवर जनतेच्या सह्या घेऊन ठिकठिकाणी नागरिकांना भेटून सरकारला, अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली आहेत. आरजी केवळ मतांसाठी काम करत नाहीत, तर मतदारांना, नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा परब यांनी केला.

...म्हणून आम्ही एक वर्ष गप्प होतो

परब म्हणाले, आम्ही एक वर्ष गप्प राहिलो. कार्यकर्त्यांना एका वर्षासाठी त्यांची वैयक्तिक कामे होती ती पूर्ण करण्यास मुदत दिली. आता गणेश चतुर्थीनंतर आरजी पुन्हा नव्या जोमाने, नव्या दमाने काम करणार. ज्या आमदारांनी मतदारांचा विश्वासघात करून निवडून आल्यानंतर मतदारांना बाय-बाय केले, अशा आमदारांच्या घरासमोर ठाण मांडून आंदोलन केले जाईल.

आमदाराने विधानसभेत किती प्रश्न मांडले?

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेत पेडणेवासीयांचे किती प्रश्न मांडले? असा सवाल उपस्थित केला. मतदारसंघातून बिगर मतदारसंघातील उमेदवार निवडून येतात. स्वतःचे कल्याण साधताना माया जमवतात आणि निघून जातात. मात्र, भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, असा आरोप मनोज परब यांनी केला.

भूमिपुत्रांवरील अन्याय; आवाज उठविणार

भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आणि भूमिपुत्रांवर अन्याय कोणत्याही क्षणी झाला, तर आरजी नेहमी तत्पर असेल. सर्वसामान्यांच्या समस्या लोकप्रतिनिधी सोडवण्यास अपयशी ठरल्याने आरजीला आता कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी गावागावात संघटना मजबूत करण्याबरोबरच गावातील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या याबाबत टप्प्याटप्याने आवाज उठवला जाईल, असेही परब म्हणाले.

थीम पार्कला थारा नाहीच : परब

मनोज परब म्हणाले, पेडणे येथील नियोजित थीम पार्क प्रकल्पाविषयी आरजीचा पूर्णपणे विरोध आहे. याप्रकरणी जमीन घोटाळ्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. थीम पार्क केवळ नावासाठी असणार, परंतु गॅम्बलिंग कॅसिनो हे प्रकार या ठिकाणी होणार असल्याने त्याला थारा दिला जाणार नाही, असा इशारा परब यांनी दिला.

 

Web Title: agitate against defectors revolutionary goans party on the offensive against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.