मुख्यमंत्र्यांच्या उपचारांसाठी ‘एम्स’च्या डॉक्टरांचे पथक गोव्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 09:28 PM2019-02-24T21:28:22+5:302019-02-24T21:28:40+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी दिल्लीहून ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) इस्पितळाचे पथक सायंकाळी गोमेकॉत दाखल झाले. 

AIIMS doctors team in Goa for treatment of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या उपचारांसाठी ‘एम्स’च्या डॉक्टरांचे पथक गोव्यात दाखल

मुख्यमंत्र्यांच्या उपचारांसाठी ‘एम्स’च्या डॉक्टरांचे पथक गोव्यात दाखल

googlenewsNext

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी दिल्लीहून ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) इस्पितळाचे पथक सायंकाळी गोमेकॉत दाखल झाले. 

दिल्लीत ‘एम्स’मध्ये असताना याच डॉक्टरांच्या निगराणीखाली मनोहर पर्रीकर होते. प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी दोनापॉल येथील निवासस्थानातून गोमेकॉत हलविण्यात आले होते. त्यांना जीआय अँडोस्कोपीसाठी दाखल केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आले होते. तेथे ४८ तास निगराणीखाली ठेवावे लागणार असे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु रविवारी दिल्लीहून डॉक्टर आणण्यात आले. प्राप्त माहितीनुसार ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागाचे असोसिएट डीन (संशोधन)डॉ. प्रमोद गर्ग हे या गोव्यात आलेल्या डॉक्टरांच्या पथकाचे नेतृत्त्व करीत आहेत. 

मुख्यमंत्री कार्यालयातून मात्र मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केला जात आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी सकाळी गोमेकॉत भेट देऊन आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आरोग्याच्या सर्व निकषांवर समाधानकारक असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, ‘ मी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटलो. उद्यापर्यंत त्यांना निगराणीखाली ठेवले जाईल. मनोहर पर्रीकर अ‍ॅक्टिव्ह आणि अलर्टही आहेत, असे नमूद करुन लोकांनी तर्कवितर्क लढवू नयेत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन विश्वजित यांनी केले. 

१४ फेब्रुवारी २0१८पासून मनोहर पर्रीकर आजारी आहेत. प्रथम त्यांना मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल केले. तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर ३ मार्च २0१८ रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले. तेथून १४ जून रोजी परतले. त्यानंतर १0 ऑगस्ट रोजी पुन: अमेरिकेला उपचारांसाठी केले आणि २२ ऑगस्ट रोजी परतले.  त्यानंतर महिनाभर दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेऊन १५ सप्टेंबर रोजी ते परतले. अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर गेल्या २ जानेवारी रोजी ते कार्यालयात रुजू झाले. २७ जानेवारी रोजी तिस-या मांडवी पुलाच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थिती लावली. ३१ जानेवारी रोजी पुन: त्यांना एम्समध्ये नेण्यात आले तेथून गेल्या ५ रोजी ते परतले. गेल्या ९ रोजी भाजपाच्या बूथ कार्यकर्ता संमेलनातही पक्षाध्यक्ष अमित शहा आले होते तेव्हा त्यांनी उपस्थिती लावली. 

Web Title: AIIMS doctors team in Goa for treatment of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.