आसामी युवकाच्या खून प्रकरणात अजित बेजुबारवा याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 06:32 PM2020-03-06T18:32:26+5:302020-03-06T18:32:29+5:30
पोकेरमोल - काले येथे खुनाची ही घटना घडली होती. कुडचडे पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करताना संशयित अजित याला अटक केली होती.
मडगाव: गोव्यात एका आसामी युवकाच्या खून प्रकरणात संशयिताला न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अजित बेजुबारवा असे आरोपीचे नाल नाव आहे. काले - सांगे येथे मूळ आसाम येथील रतन दास या पंचवीस वर्षीय युवकाचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता. मागच्या महिन्यात अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष डी. पाटकर यांनी या संशयिताला भादंसंच्या ३0२ कलमाखाली दोषी ठरविले होते. आज शुक्रवारी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावताना तीस हजाररुपयांचा दंडही फर्माविला.
सरकार पक्षातर्फे वकील व्ही. जे. कॉस्ता यांनी बाजू मांडली. या खटल्यात एकूण सोळा साक्षिदार न्यायालयात तपासण्यात आले. कुडचडे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार ३१ डिसेंबर २0१५ साली खुनाची ही घटना घडली होती. कामगार कामावरुन संशयिताने रतन याच्याकडे वाद उरकरुन काढून नंतर त्याच्या पोटात स्वयंपाक घरातील चाकू खुपसला होता. रक्तस्त्राव होउन नंतर रतन याला मरण आले होते. मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात त्याला दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले होते.
पोकेरमोल - काले येथे खुनाची ही घटना घडली होती. कुडचडे पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करताना संशयित अजित याला अटक केली होती.