भारतीय सिनेसृष्टीचा आजपासून गोव्यात उत्सव, अक्षय कुमार, करण जोहरसह अनेक दिग्गज येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 08:09 PM2018-11-19T20:09:57+5:302018-11-19T20:12:17+5:30

आठ दिवस चालणा-या इफ्फी ह्या भारतीय सिनेसृष्टीच्या सर्वोच्च व रुपेरी उत्सवाला आज मंगळवारी सायंकाळी आरंभ होत आहे.

Akshay Kumar, Karan Johar and many others will present IFFI | भारतीय सिनेसृष्टीचा आजपासून गोव्यात उत्सव, अक्षय कुमार, करण जोहरसह अनेक दिग्गज येणार

भारतीय सिनेसृष्टीचा आजपासून गोव्यात उत्सव, अक्षय कुमार, करण जोहरसह अनेक दिग्गज येणार

googlenewsNext

- सदगुरू पाटील

पणजी - आठ दिवस चालणा-या इफ्फी ह्या भारतीय सिनेसृष्टीच्या सर्वोच्च व रुपेरी उत्सवाला आज मंगळवारी सायंकाळी आरंभ होत आहे. भाषणो किंवा तत्सम सोपस्कारांवर जास्त भर न देता यावेळी 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनात सिनेविषयक मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर भर असेल. बॉलिवूडच्या मूख्य धारेतील कलाकारांच्या सहभागाने प्रेक्षकांना इतिहास, अॅक्शन व रोमान्सद्वारे भारतीय सिनेसृष्टीचा मनोहारी प्रवास अधोरेखित झालेला पहायला मिळेल.

भारतीय चित्रपटसृष्टीचा वैभवशाली वारसा विविध कार्यक्रमांद्वारे उद्घाटनावेळी सादर केला जाईल. सोनू सूद, शिल्पा राव यांचे कार्यक्रम होतील. नृत्य सोहळाही होईल. 90् मिनिटे करमणुकीचा सोहळा चालेल. अक्षय कुमार, करण जोहर, मधुर भांडारकर, सुभाष घई, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड, राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा, बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आदी अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती असेल.

भारतीय व आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज रेड कार्पेटवरून उद्घाटनस्थळी येतील. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात उद्घाटनाचा सोहळा सायंकाळी 4.30् वाजता होईल. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने इफ्फीचे आयोजन केले आहे. उद्घाटनाला जोडूनच फिल्म फॅसिलीटेशन कार्यालयाचे उद्घाटन केले जाईल. द अस्पन पेपर्स हा उद्घाटनाचा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक ज्युलियन लँडायस व अन्य कलाकार द अस्पन पेपर्सविषयी बोलतील. हे सगळे कलाकार गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी सोमवारी सायंकाळी इफ्फीस्थळी पत्रकार परिषदही घेतली व भारतात आपल्या सिनेमाचा जागतिक प्रिमिअर होत असल्याविषयी  अभिमान वाटत असल्याचे नमूद केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाचे ज्युरी व पॉलिश दिग्दर्शक रॉबर्ट ग्लीन्सकी हेही आज प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

पर्रीकरांविना इफ्फी 

68 देशांमधील एकूण 212 चित्रपट इफ्फीवेळी दाखविले जाणार आहेत. येथील आयनॉक्समध्ये बहुतांश सिनेमा प्रदर्शित होतील. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात एकूण 15 सिनेमा दाखविले जातील व त्यात 3 भारतीय आहेत. झारखंड व इस्रायलवर यंदा इफ्फीचा फोकस असेल. 28 रोजी इफ्फीचा समारोप सोहळा होईल. क्रिडाविषयक अनेक सिनेमा इफ्फीत दाखविले जातील. यंदा प्रथमच मुख्यमंत्रीपदी असून देखील मनोहर पर्रीकर हे त्यांच्या आजारामुळे इफ्फीच्या उद्घाटन व समारोप सोहळ्य़ात सहभागी होऊ शकणार नाहीत.

दरम्यान, यंदा इफ्फी उत्साह हरवल्यासारखा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत पणजीत कामे पूर्ण झालेली नाहीत. पाऊसही पडल्यामुळे इफ्फीच्या तयारीत व्यत्यय आला. मात्र इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी येथे पत्रकारांना सांगितले, की एखाद्या सोहळ्य़ापूर्वी पाऊस येणे हे शुभच आहे. आमच्या उत्साहावर त्यामुळे परिणाम झालेला नाही. यंदाच्या इफ्फीत अधिक वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम पहायला मिळतील.

Web Title: Akshay Kumar, Karan Johar and many others will present IFFI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.