आलेक्स सिक्वेरा यांचा आज शपथविधी, निलेश काब्राल यांचा अखेर राजीनामा
By वासुदेव.पागी | Published: November 19, 2023 12:52 PM2023-11-19T12:52:14+5:302023-11-19T12:52:31+5:30
कॉंग्रेसमधून भाजपात आलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांचा आज सायंकाळी शपथविधी होणार आहे.
पणजी : रुसवे फुगवे करून शेवटी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना सादर केला. कॉंग्रेसमधून भाजपात आलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांचा आज सायंकाळी शपथविधी होणार आहे.
पक्षाशी प्रामाणिक राहूनही आपल्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा मागितल्यामुळे मंत्री काब्राल खूप नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांना हवे तर त्यांना बडतर्फ करू दे असाही सल्ला दिला होता. मात्र पक्षाच्या हितासाठी आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे काब्राल यांनी म्हटले आहे. त्यामुळे आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीबनण्यासाठीचे मार्ग खुले झाले आहेत. सायंकाळी ७ वाजता राजभवनावर शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती राजभवनातील. सूत्रांकडून देण्यात आली.
राजीनामा देण्यापूर्वी काब्राल हे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना त्यांच्या साखळी येथील निवासस्थानी जाऊन भेटले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतप त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. काब्राल यांनी पक्षाच्या हितासाठी मंत्त्रीपदाचा जीनामा दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्याचे पक्षाने आश्वासन दिले होते असेही त्यांनी सांगितले. त्या आश्वासनाची पूर्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.