दलालीवर नियंत्रणासाठी कायद्यात दुरुस्ती : रोहन खंवटे
By काशिराम म्हांबरे | Published: December 19, 2023 12:44 PM2023-12-19T12:44:32+5:302023-12-19T12:44:42+5:30
हे बेकायदेशीर प्रकार बंद व्हावे, दलालांवर कारवाई व्हावी यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.
काशीराम म्हांबरे
म्हापसा: किनारी भागातील बहुतेक व्यवसायात बेकायदेशीर दलालांनी घुसखोरी केली आहे. हे गैरप्रकार नियंत्रणात आणण्यासाठी दलालांवर कारवाई झाल्यास किनारी भागात बेकायदेशीरपणेसुरु असलेले डान्सबार, वेश्या व्यवसाय सारखे प्रकार आपोआप बंद होतील. हे बेकायदेशीर प्रकार बंद व्हावे, दलालांवर कारवाई व्हावी यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.
म्हापसा येथील मुक्ती दिन सोहळ््याच्या पाशर्वभुमीवर खंवटे पत्रकारांशी बोलत होते. दलालांवर कारवाईसाठी पोलीस दल आपले काम योग्य पद्धतीने करीत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पोलिसांनी जास्त दलालांवर कारवाई केली असल्याची माहिती खंवटे यांनी पत्रकारांना दिली. स्थानीक कळंगुट पंचायतीने डान्सबारवर गेल्या वर्षी कारवाई केली होती. तरी सुद्धा हे प्रकार आजही सुरु असल्याने ते बंद होणे गरजेचेअसल्याचे मंत्री म्हणाले.
सुरक्षीत वातावरण पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र जबाबदार पूर्ण वातावरणात पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटकांनी सुद्धा जबाबदारीने वागण्याची गरज खंवटे यांनी बोलताना व्यक्त केली.