गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 07:58 PM2018-05-21T19:58:15+5:302018-05-21T19:58:15+5:30

विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

Amit Shah on Goa Government | गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा

गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा

Next

पणजी - विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

कर्नाटकमधील सत्तानाटय़ात भाजपचे हात पोळले गेल्यानंतर शहा यांनी आता प्रथमच दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना गोवा आणि मणिपुरविषयी भाष्य केले आहे. कर्नाटकमध्ये लोकांचा कौल भाजपला होता. भाजप तिथे सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आम्ही सरकार घडविण्यासाठी दावा केला. गोवा व मणिपुरमध्ये जरी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरी सरकार घडविण्यासाठी त्यांनी दावा केला नव्हता. सर्वात मोठा पक्ष ठरून देखील गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो शक्य होत नव्हते म्हणून आम्ही पुढाकार घेऊन सरकार घडवले. भाजपने गोवा राज्यपालांकडे जाऊन दावा केला म्हणून राज्यपालांनी आम्हाला सरकार बनविण्यासाठी बोलावले, असे शहा म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपला बहुमतासाठी केवळ सात जागा कमी पडल्या. यावरून लोकांचा कौल कळून येतो. आम्ही जर सरकार बनविण्यावर दावा केला नसता तर ते जनादेशाविरुद्ध ठरले असते. म्हणून आम्ही सरकार घडविले होते. काँग्रेसकडून पराभव देखील विजय म्हणून साजरा केला जातो. काँग्रेसची ही नवी पद्धत 2019 सालार्पयत कायम रहावी. म्हणजे आमचे काम सोपे होईल, असा टोला शहा यांनी लगावला. काँग्रेसचा आता सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रंवर विश्वास आहे असेही शहा मार्मिकपणो म्हणाले. 

दरम्यान, गेल्यावर्षी गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच शहा यांनी लगेच दिल्लीत विधान केले होते, की कोणत्याही स्थितीत गोव्यात देखील भाजपचे सरकार अधिकारावर यायला हवे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने गोव्यात पाठविले गेले होते आणि गडकरी यांनी मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई व अपक्ष आमदारांशी संपर्क साधून व त्यांच्या मागण्या मान्य करून सरकार घडविले हा इतिहास ताजा आहे. काँग्रेस पक्ष नेता निवडत बसला होता व तत्पूर्वीच भाजपने एकवीसजणांचे संख्याबळ जमविले व राज्यपालांकडे धाव घेतली होती.

Web Title: Amit Shah on Goa Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.