निनावी फोन ने पोलिसांची उडवली तारांबळ

By काशिराम म्हांबरे | Published: August 22, 2023 07:10 PM2023-08-22T19:10:07+5:302023-08-22T19:10:20+5:30

मंगळवार २२ रोजी सकाळी १०.३० च्या अंदाजाला युवतीचा खून झाल्याचे माहिती देणारा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला.

An anonymous phone call to police | निनावी फोन ने पोलिसांची उडवली तारांबळ

निनावी फोन ने पोलिसांची उडवली तारांबळ

googlenewsNext

म्हापसा : एका युवतीचा खून झाल्याचा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षाला करुन पोलिसांची तारांबळ उडवणारा तो इसम शेवटी तो मद्यपी तसेच मानसीकरित्या अस्वस्थ असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निस्वास सोडला.

मंगळवार २२ रोजी सकाळी १०.३० च्या अंदाजाला युवतीचा खून झाल्याचे माहिती देणारा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. त्याचवेळी फोन करणाºया इसमाने खून शिवोली येथील होला क्रॉस परिसरात झाल्याची माहिती दिली.  त्यानुसार पोलिसांकडून हालचाली सुरु झाल्या व खून झाल्याचे सांगण्यात आलेल्या त्या युवतीचा शोध घेण्याचे काम आरंभण्यात आले.  

म्हापसा पोलिसांसोबत हणजूण तसेच कोलवाळ पोलीस या शोध मोहिमेत सहभागी झाले. शेवटी काहीच हाती लागले नसल्याने फोन करणाºया व्यक्तीचा तपास सुरु झाला. ज्या भागात खून झाल्याची माहिती देण्यात आली तो भाग हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतो. हणजूण पोलिसांनी ज्या क्रमांकावर फोन आलेला त्या इसमाचा पत्ता शोधून काढला.

शिवोलीत तो इसम  सापडल्यानंतर त्याचा त्याच्या घरात जाऊन ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तो इसम मद्यपी तसेच मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचे आढळून आले.  त्या इसमानेआपल्या घरातूनच हा निनावी कॉल केला होता. त्याच्या कॉल लॉगवरून त्यांनीच फोन केला असल्याचेचौकशी अंती  स्पष्ट झाले. त्याला हणजूण पोलीस स्थानकावर आणून त्याची चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. 

 

Web Title: An anonymous phone call to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.