ती रात्रपाळी त्याची अखेरची ठरली.., काम आटोपून घरी जात असताना एमआरएफ कर्मचाऱ्यावर काळाचा घाला
By आप्पा बुवा | Updated: June 24, 2024 16:18 IST2024-06-24T16:18:03+5:302024-06-24T16:18:23+5:30
पार उसगाव येथे झालेल्या एका अपघातात एमआरएफ कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे

ती रात्रपाळी त्याची अखेरची ठरली.., काम आटोपून घरी जात असताना एमआरएफ कर्मचाऱ्यावर काळाचा घाला
फोंडा : पार उसगाव येथे झालेल्या एका अपघातात एमआरएफ कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्तानुसार गावठाण खांडेपार येथील संजय बाबलो पेडणेकर (वय 52 ) हे एमआरएफ कंपनीत कामाला होते .नेहमीप्रमाणे आपली रात्रपाळीची शिफ्ट आटोपून तो आठ वाजता कंपनीतून बाहेर निघाले. कंपनीच्या गेटच्या काही अंतरावरच पार - उस गाव येथे राष्ट्रीय महामार्गवर एक गाय अचानक आडवी आली.
सदर गाईला चुकवण्याच्या नादात संजय पेडणेकर हे रस्त्यावर पडले. पडत असताना त्यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. अपघाताची कल्पना येताच लोकांनी ॲम्बुलन्स बोलवून संजय पेडणेकर यांना इस्पितळात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फोंडा पोलिसांनी अपघात स्थळीचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.