...आणि आॅनर किलिंगच्या बातम्यांचा पाऊस पडला

By Admin | Published: July 19, 2016 08:39 PM2016-07-19T20:39:25+5:302016-07-19T20:39:25+5:30

‘सैराट’ चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगावर खूप चर्चा झाली. या प्रसंगानंतर आॅनर किलिंगच्या बातम्यांची कात्रणे दाखवावीत, असा सैराटच्या चमूचा प्रारंभीचा विचार होता. त्यासाठी काही

... and news of Annie Killing rained down | ...आणि आॅनर किलिंगच्या बातम्यांचा पाऊस पडला

...आणि आॅनर किलिंगच्या बातम्यांचा पाऊस पडला

googlenewsNext

- मिथुनचंद्र आणि पूजा : ‘लोकमत’च्या पणजी कार्यालयास सदिच्छा भेट

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 -  ‘सैराट’ चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगावर खूप चर्चा झाली. या प्रसंगानंतर आॅनर किलिंगच्या बातम्यांची कात्रणे दाखवावीत, असा सैराटच्या चमूचा प्रारंभीचा विचार होता. त्यासाठी काही कात्रणांची जमवाजमव सुरू झाली, तेव्हा अशा बातम्यांच्या कात्रणांचा अक्षरश: पाऊसच पडला. त्यात वादग्रस्तताही होती. नंतरच्या प्रवासात कात्रणे दाखविण्याचा विचार मागे पडला आणि रक्तपावले झाल्यानंतर एक प्रवास थबकला... थांबला नव्हे; कारण हा सिनेमा डोक्यावर घेऊन प्रेक्षक बाहेर पडले. त्यामुळे महाराष्ट्रानेच काय, अखंड देशाने हा चित्रपट डोक्यावर घेतला. मिथुनचंद्र चौधरी आणि पूजा डोळस बोलत होत्या.
मिथुनचंद्र म्हणजे सैराटमधील प्राध्यापक लोखंडे. पूजा म्हणजे आर्चीला पकडून पोलीस ठाण्यात आणणारी महिला कॉन्स्टेबल. या ओळखीशिवायही या दाम्पत्याची स्वतंत्र अशी ओळख आहे. दोघेही ‘सैराट’च्या निर्मिती चमूचा भाग आहेत. मिथुनचंद्रने ‘कम्पलसरी हेल्मेट’ हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी ‘पायवाट’ची निर्मिती केली. ‘पायवाट’ने राष्ट्रीय पुरस्कार शैक्षणिक विभागात पटकावला. पूजाने सैराटसाठी साहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. या दोघांनी सोमवारी ‘लोकमत’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली आणि गप्पाही सैराट झाल्या. सैराटच्या निर्मितीत समूहभावना कशी होती, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. पडद्याआडच्या गमती-जमती उलगडल्या.
अस्सल देशीयता या वैशिष्ट्यामुळे चित्रपट महाराष्ट्राबाहेर पोहोचला. अमराठी प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला. चित्रपट गाजेल एवढा विश्वास होताच; पण तो त्याही पुढे जाऊन त्याने रेकॉर्ड ब्रेक केले, हे सांगताना दोघांच्याही चेहऱ्यावर अपार आनंद झळकत होता. आपल्यासमोर घडते आहे, ते खरे आहे हे प्रेक्षकांना खूप भावले. याशिवाय कलाकार हे बनचुके व्यावसायिक कलाकार नव्हते. ते जसे बोलतात तसेच चित्रपटात दाखविले गेले आणि हा प्रयोग प्रेक्षकांना खूपच आवडला. हे कलाकार दोन महिने एकत्रितपणे राहात होते. त्या काळात त्यांचे अभिनय आणि अन्य बाबींचे प्रशिक्षण झाले. याची काही जबाबदारी पूजा यांच्यावरही होती.
चित्रपटाचे खेळ जाहीर होण्यापूर्वी आणि नंतर अल्पकाळ विरोध झाला. दुसरीकडे हा चित्रपट झळकला आणि प्रेक्षकांनी उचलून धरला, तसतसा विरोध मावळला. विरोध करणारे खूप थोडे होते. त्यांचेही प्रबोधन झाले असावे, असे वाटते. नंतर संबंधित संघटनेनेच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुरस्कार जाहीर केला. विरोध अल्पजीवी ठरला, अशी आठवणही चर्चेत अधोरेखित झाली.

- चित्रपट आणि वास्तव
चित्रपट प्रदर्शित झाला आणि कोल्हापुरात सैराटसारखीच एक घटना घडली. आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला मुलीच्या भावांनी ठार केले. आॅनर किलिंगच्या अशा अनेक घटना चर्चेदरम्यान उल्लेख झाला.

प्रेम ही एवढी सुंदर गोष्ट आहे, की त्याला विरोध का करावा? प्रेम करावयाचे असेल तर अन्य सगळ्याच गोष्टींची आडकाठी ठरूच नये. असे असले तरी सामाजिक वास्तव भयंकर आहे, ते चित्रपटात दाखवले आहे.
- पूजा, साहाय्यक दिग्दर्शक, सैराट

आयुष्य छान जगायचे असेल तर जात, धर्म, देव आदी बाबी आड येता उपयोगी नाहीत. आपण छान विचार केला पाहिजे. काही बाबी दुरुस्त करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
- मिथुनचंद्र चौधरी, दिग्दर्शक, अभिनेता

- आर्चीला घडवण्यातही पूजाचा सिंहाचा वाटा
‘सैराट’ची नायिका रिंंकू राजगुरू ही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मैत्रिणीची मुलगी. मैत्रिणीने विश्वासाने तिला या चमूकडे सोपविले. ती अननुभवी; परंतु दोन महिने आपल्याकडे ठेवून घेऊन पूजा डोळस हिने तिला ‘तयार’ करण्याचे काम केले. रिंकू चित्रपटात जी ‘भाषा’ बोलते, तीच तिची नेहमीच्या बोलण्याचीही भाषा आहे.

Web Title: ... and news of Annie Killing rained down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.