काखेला कळसा, गावाला वळसा! दाबोळी विमानतळ जवळ असतानाही विमान बंगळुरुला नेल्याने संताप
By किशोर कुबल | Published: July 9, 2024 02:51 PM2024-07-09T14:51:17+5:302024-07-09T14:51:30+5:30
प्रवाशांनी तसेच सत्ताधारी व विरोधी आमदारांनीही तीव्र संताप व्यक्त केला.
किशोर कुबल / पणजी
पणजी : दोहाहून आलेले विमान मोपा विमानतळावर खराब हवामानामुळे न उतरवता थेट बंगळुरूला नेले. दाबोळी विमानतळ जवळ असताना तेथे विमान उतरविण्याचा प्रयत्न न करता ते थेट बंगळुरूला नेल्याने प्रवाशांनी तसेच सत्ताधारी व विरोधी आमदारांनीही तीव्र संताप व्यक्त केला.
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे दोहाहून आलेल्या विमानाच्या पायलटला खराब हवामानाची कल्पना देऊन येथे विमान उतरवू नका, असे कळवल्यावर पायलटने थेट बंगळुरूला विमान नेले. वास्तविक दाबोळी विमानतळ जवळ होता. तेथे विमान उतरवता आले असते. परंतु प्रवाशांना थेट बंगळुरुला नेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मायकल लोबोंचा संताप
सत्ताधारी आमदार मायकल लोबो यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, मी या संदर्भात येथे विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचना आणून हे प्रकार टाळण्याचे मागणी करणार आहे. ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी मला स्वतःलाही हाच अनुभव आला.'