गोव्यात दोन ठिकाणी शैक्षणिक वसाहती, मुख्यमंत्र्यांची नोबेल पुरस्कार मालिकेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 07:57 PM2018-02-01T19:57:54+5:302018-02-01T19:58:01+5:30

गोव्यात दोन ठिकाणी शैक्षणिक वसाहती उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. वैज्ञानिक संशोधनाला प्राधान्य देण्याच्या हेतूने दरवर्षी ‘इनोव्हेशन इन सायन्स’ ही स्पर्धा उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल.

The announcement of the Nobel Prize in Literary Colonies, Chief Minister's Nobel Prize in two categories in Goa | गोव्यात दोन ठिकाणी शैक्षणिक वसाहती, मुख्यमंत्र्यांची नोबेल पुरस्कार मालिकेत घोषणा

गोव्यात दोन ठिकाणी शैक्षणिक वसाहती, मुख्यमंत्र्यांची नोबेल पुरस्कार मालिकेत घोषणा

Next

पणजी : गोव्यात दोन ठिकाणी शैक्षणिक वसाहती उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. वैज्ञानिक संशोधनाला प्राधान्य देण्याच्या हेतूने दरवर्षी ‘इनोव्हेशन इन सायन्स’ ही स्पर्धा उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतली जाईल. संशोधनाच्या बाबतीत नव्या कल्पना सूचविल्यास त्या पुढे नेण्यासाठी वर्षभर सरकार अर्थसाहाय्य करील तसेच नोबेल पुरस्कार मालिकाही पुढे चालूच ठेवली जाईल, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. 
येथील कला अकादमी संकुलात आयोजित नोबेल पुरस्कार मालिका भारत : २0१८ चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने स्वीडनच्या नोबेल मिडिया, नोबेल म्युझियम व गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन केले आहे. व्यासपीठावर इंग्लंडचे १९९३ सालचे फिजिओलॉजी/ मेडिसीनचे नोबेल विजेते रिचर्ड रॉबर्टस्, जर्मनीचे १९९५ सालचे फिजिओलॉजी/ मेडिसीनचे नोबेल विजेते ख्रिस्तीयान नुसेन वॉलहार्ड, फ्रान्सचे २0१२ सालचे भौतिकशास्राचे नोबेल विजेते सर्ज हॅरोच, इंग्लंडचे २0१५ सालचे रसायनशास्राचे नोबेल विजेते थॉमस लिंडाल, नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष कार्ल हेन्रिक हेल्दिन, भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी खात्याचे सचिव के. विजय राघवन, नोबेल मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मात्तियस फिरेनियस, नोबेल म्युझियमचे संचालक डॉ. ओलांव आमेलिन, स्वीडनच्या मुंबईतील कोन्सुल जनरल श्रीमती उलरिका सनबर्ग, राज्याचे विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव दौलतराव हवालदार उपस्थित होते. 

‘गोव्याला विज्ञानाचा वारसा’
पर्रीकर म्हणाले की, गोव्याला विज्ञानाचा वारसा आहे. या भूमीने डॉ. डी. डी. कोसंबी, रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर असे एकापेक्षा एक शास्रज्ञ दिले. देशात गोव्याचे नाव वैज्ञानिक वसाहत म्हणून पुढे यावे यासाठी केवळ वैज्ञानिक शिक्षणावरच भर दिला जात नाही तर अन्य दिशेनेही पावले उचलली आहेत. मनुष्यबळ क्षमता वाढावी तसेच ज्ञानाधारित राज्य निर्माण व्हावे ही अपेक्षा आहे. ‘इनोव्हेशन इन सायन्स’ स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शास्रज्ञांना निमंत्रित केले जाईल. त्यांच्याकडून कल्पना घेतल्या जातील. नोबेल मालिका दरवर्षी आयोजित केली जाईल.
नोबेल विजेत्या ख्रिस्तीन वोलहार्ड यांनी विज्ञान हे केवळ मानवी जीवन सुधारण्यासाठीच नव्हे तर मूलभूत संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी उपयोगी आहे. संशोधनामागे केवळ काहीतरी मोठे उघडकीस आणणे एवढाच हेतू नसतो तर त्यातील गुंतागुंत शोधून काढण्याचाही हेतू असतो, असे प्रतिपादन केले. सध्या आपण मासळीवर संशोधन करीत आहे. मासळीचे प्रकार, त्यांचे रंग आदी गोष्टींवर संशोधन चालू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  विद्यार्थ्यांनी नेहमीच सजग राहिले पहिजे. ज्या गोष्टींचे आकलन होत नाही त्याबद्दल प्रश्न विचारुन माहिती करुन घ्यावी, असे त्या म्हणाल्या. उपस्थित नोबेल विजेत्या मान्यवरांना मुख्यमंत्र्यांहस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

दर्यासंगमावर नोबेल विज्ञान प्रदर्शन 
नोबेल पुरस्कार मालिकेची भारतातील ही दुसरी आवृत्ती आहे. ‘विज्ञानाचा जीवनावर परिणाम’ अशी याची संकल्पना आहे. यानिमित्त दर्यासंगमावर नोबेल विज्ञान प्रदर्शनही भरविण्यात आले. या प्रदर्शनाची संकल्पना ‘आयडियाज चेंजिस दि वर्ल्ड ’ अशी आहे. दर्यासंगमावर मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नोबेल मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मात्तियस फिरेनियस म्हणाले की, नोबेल पुरस्कार मालिकेसाठी यावर्षी पुन: भारतात येताना आनंद हेत आहे. गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता. 
या प्रदर्शनात नोबेल पुरस्काराचे जनक आल्फे्रड नोबेल तसेच इतर नोबेल विजेत्या शास्रज्ञांनी शोध लावलेल्या मूळ वस्तूंचा समावेश आहे. विसाव्या शतकातील संशोधनाचा मूर्तिमंत इतिहासच या प्रदर्शनाच्या माध्यमातून उभा केला आहे. नोबेल विजेत्या शास्रज्ञांनी लावलेल्या वेगवेगळ्या शोधासंबंधीची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. 
प्रदर्शन आज २ पासून २५ तारीखपर्यंत लोकांसाठी खुले असणार आहे. नोबेलचे जनक आल्फ्रेड नोबेल यांच्या जीवनपट या प्रदर्शनात उलगडलेला आहे. नोबेल विजेत्यांना संशोधन केलेल्या मूळ वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत तसेच या संशोधनाचा भविष्यातील परिणाम यावरही भाष्य आहे. 

आज-उद्या विद्यार्थ्यांशी संवाद 
आज २ आणि उद्या ३ रोजी नोबेल विजेत्यांशी संवाद साधण्याची संधी  विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना मिळणार आहे. शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठातील विद्यार्थी यात सहभागी होतील. उद्या एनआयओच्या शास्रज्ञांबरोबर नोबेल विजेते संवाद साधतील. 

Web Title: The announcement of the Nobel Prize in Literary Colonies, Chief Minister's Nobel Prize in two categories in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.