वार्षिक सरासरी २ हजार व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 07:39 PM2019-02-27T19:39:39+5:302019-02-27T20:29:47+5:30

पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

The annual average heart attack death of 2,000 people in Goa | वार्षिक सरासरी २ हजार व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

वार्षिक सरासरी २ हजार व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

googlenewsNext

पणजी- राज्यात हृदयरोग्यांवर उपचारांसाठी सरकारी व खासगी क्षेत्रात अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी व वार्षिक पंधरा- वीस कोटी रुपये त्यावर खर्च केले जात असले तरी, हृदयविकाराचा झटका येणा-या रुग्णांची संख्या मात्र कमी झालेली नाही. 

१०८ रुग्णवाहिका सेवेत अधिकाधिक रुग्णवाहिका जमा केल्या जात आहेत. २०१४ साली गोवा सरकारने कार्डियाक सेंटर सुरू केले. शिवाय खासगी इस्पितळे व सरकार विविध ठिकाणी हृदयरोगावर उपचारांची सोय करत आहे. डॉ. शेखर साळकर यांनी मात्र बुधवारी अधिकृत आकडेवारी जाहीर केली व राज्यात हृदयविकाराचा झटका येउन मृत्यू होणाºया रुग्णांची संख्या गेल्या पाच वर्षांत वाढतच असल्याचे नमूद केले. २०१३ साली १८५५ व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१४ साली १९९६ तर २०१५ साली २०८३ व्यक्तींना हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे आकडेवारी दाखवून देते. २०१६ साली २१२२ तर २०१७ साली २१९० व्यक्तींना हार्ट अटेकने मृत्यू आला. २०१८ सालची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही असे डॉ. साळकर म्हणाले. 

कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या गोव्यात २०१३ साली ९१७ होती. २०१४ साली ७८८ कॅन्सर रुग्ण दगावले. २०१५ साली ९१५, २०१६ साली ९२२ तर २०१७ मध्ये ९६२ कॅन्सर रुग्ण दगावले. यकृत निकामी ठरल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०१३ साली ७९१ होती. २०१४ साली अशा प्रकारचे ९६६ रुग्ण मृत्यू पावले. २०१५ साली ८५६ तर २०१६ साली ८१३ रुग्ण दगावले. २०१७ साली लिव्हर निकामी ठरलेले ७६२ रुग्ण मृत झाल्याचे साळकर म्हणाले. किडणीशी निगडीत आजाराचे ३६४ रुग्ण २०१३ साली मृत्युमुखी पडले. २०१४ साली २७९ तर २०१५ साली ४०० रुग्ण मृत्यूमुखी पडले. २०१५ साली मूत्रपिंडाशी संबंधित रोगाने ४१७, तर २०१६ साली ३८० रुग्ण दगावले. 

ट्राफिक सेंटीनल योग्य

डॉ. साळकर म्हणाले, की वाहन अपघातात वार्षिक सुमारे अडिचशे ते तीनशे व्यक्तींचा बळी जातो. २०१५ साली ३०२, २०१६ साली ३१६, २०१७ मध्ये ३०६ आणि २०१८ साली २४८ व्यक्तींचा बळी वाहन अपघातात गेला. केवळ तिस-चाळीस वर्षांचे दुचाकीस्वार ठार होतात व हे सगळे अत्यंत निरोगी असतात. ट्राफीक सेन्टीनल योजनेने ७५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत. एका साध्या योजनेने दिलेले हे मोेठे योगदान आहे. ही योजना बंद केली जाऊ नये. योजनेमुळे ज्या समस्या निर्माण होतात, त्या सोडविता येतील व त्यासाठी एखाद्या लवादाचीही नियुक्ती करता येईल. ट्राफीक सेन्टीनल योजनेमुळे अनेक निरोगी व्यक्तींचे प्राण वाचतील.

Web Title: The annual average heart attack death of 2,000 people in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.