शिवनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:20 AM2023-12-29T11:20:31+5:302023-12-29T11:21:19+5:30
रविवार ३१ पर्यंत हा जत्रोत्सव चालू राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, शिरोडा : शिवनाथी शिरोडा येथील शिवनाथ संस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाला मंगळवार २६ पासून प्रारंभ झाला असून रविवार ३१ पर्यंत हा जत्रोत्सव चालू राहणार आहे.
जत्रोत्सवानिमित्त बुधवार २७ रोजी सुवासिनींच्या दिवजोत्सवांनी देवस्थानचा परिसर झगमगून गेला. हजारो सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषा करून व हातात पारंपरिक दिवज घेऊन शिवनाथ देवाची आरती ओवाळणी केली. दिवजोत्सव साजरा केला. गुरुवारी धार्मिक विधी, सायंकाळी पालखी मिरवणूक व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
आज शुक्रवारी सकाळी अभिषेक व विविध धार्मिक विधी, दुपारी आरत्या, रात्री साडेआठ वाजता शिवनाथ देवाची अश्वावरून मिरवणूक व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
उद्या शनिवारी सकाळपासून धार्मिक विधी, दुपारी आरत्या, रात्री श्रींची सुखासनातून मिरवणूक व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ३१ रोजी सकाळपासून धार्मिक विधी, दुपारी आरत्या, रात्री साडेनऊ वाजता पालखीतून मिरवणूक व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.