जागतिक कोंकणी सिने पुरस्कारात मंगळुरुच्या ‘अंथु’ची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 03:04 PM2018-12-10T15:04:05+5:302018-12-10T15:04:53+5:30
जागतिक कोंकणी सिने पुरस्कारात मंगळुरुच्या ‘अंथु’ची बाजी उत्कृष्ट चित्रपटासह दिग्दर्शन, अभिनय आणि सहअभिनय गटात बक्षिसे मडगाव: मंगळुरु येथे आयोजीत केलेल्या पहिल्या हिस्ना जागतिक कोंकणी सिने पुरस्कार सोहळ्यात मंगळुरुच्या ‘अंथु’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासह एकूण चार पारितोषिके प्राप्त झाली. रविवारी मंगळुरुच्या कलांगण येथे झालेल्या शानदार सोहळय़ात सिनेस्टार प्रकाश राय यांच्या हस्ते ही पारितोषिके देण्यात आली. गोव्याच्या ‘कनेक्शन’ या चित्रपटाला उत्कृष्ट संगीताचे बक्षीस प्राप्त झाले. एकूण आठ विभागांपैकी चार विभागात ‘अंथु’ने बाजी मारली. उत्कृष्ट फिल्मासह या फिल्माचे दिग्दर्शक करोपडी अक्षय नायक अभिनेता संजय शानभाग आणि महिला विभागातील सहकलाकार पुर्णिमा सुरेश यांना बक्षिसे प्राप्त झाली. उत्कृष्ट महिला कलाकारासाठी असलेले बक्षिस ‘सोफीया’ चित्रपटाची नायिका एस्थर नोरोन्हा, उत्कृष्ट पुरुष सहकलाकार ‘एक आसा एक ना’ या चित्रपटातील रॉनी रॉड तर उत्कृष्ट पटकथेचे बक्षिस ‘सोफीया’च्या हॅन्री फर्नाडिस यांना प्राप्त झाले. शॉर्ट फिल्म विभागात ‘आमचें घर’ या फिल्माला उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त झाले. यावेळी बोलताना प्रकाश राय यांनी अनेक संकटांना तोंड देऊन कोंकणी संस्कृती टिकून राहिली. कोंकणी फिल्मेही अशाच संघर्षातून पुढे येऊन टिकून राहिली आहेत असे प्रतिपादन केले. यावेळी प्रसिद्ध कोंकणी गायिका लॉर्ना व गोव्यातील नवोदित कलाकार नायसा लोटलीकर यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला. या रंगारंग सोहळ्याचे सुत्रसंचालन अनुराज रॉड्रीगीस, अक्षता भट व रविशंकर राव यांनी केले. यावेळी मांडसोभाणचे एरीक ओजारियो व लुईस पिंटो हे उपस्थित होते.
मडगाव: मंगळुरु येथे आयोजीत केलेल्या पहिल्या हिस्ना जागतिक कोंकणी सिने पुरस्कार सोहळ्यात मंगळुरुच्या ‘अंथु’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासह एकूण चार पारितोषिके प्राप्त झाली. रविवारी मंगळुरुच्या कलांगण येथे झालेल्या शानदार सोहळय़ात सिनेस्टार प्रकाश राय यांच्या हस्ते ही पारितोषिके देण्यात आली. गोव्याच्या ‘कनेक्शन’ या चित्रपटाला उत्कृष्ट संगीताचे बक्षीस प्राप्त झाले.
एकूण आठ विभागांपैकी चार विभागात ‘अंथु’ने बाजी मारली. उत्कृष्ट फिल्मासह या फिल्माचे दिग्दर्शक करोपडी अक्षय नायक अभिनेता संजय शानभाग आणि महिला विभागातील सहकलाकार पुर्णिमा सुरेश यांना बक्षिसे प्राप्त झाली. उत्कृष्ट महिला कलाकारासाठी असलेले बक्षिस ‘सोफीया’ चित्रपटाची नायिका एस्थर नोरोन्हा, उत्कृष्ट पुरुष सहकलाकार ‘एक आसा एक ना’ या चित्रपटातील रॉनी रॉड तर उत्कृष्ट पटकथेचे बक्षिस ‘सोफीया’च्या हॅन्री फर्नाडिस यांना प्राप्त झाले. शॉर्ट फिल्म विभागात ‘आमचें घर’ या फिल्माला उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त झाले.
यावेळी बोलताना प्रकाश राय यांनी अनेक संकटांना तोंड देऊन कोंकणी संस्कृती टिकून राहिली. कोंकणी फिल्मेही अशाच संघर्षातून पुढे येऊन टिकून राहिली आहेत असे प्रतिपादन केले. यावेळी प्रसिद्ध कोंकणी गायिका लॉर्ना व गोव्यातील नवोदित कलाकार नायसा लोटलीकर यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला. या रंगारंग सोहळ्याचे सुत्रसंचालन अनुराज रॉड्रीगीस, अक्षता भट व रविशंकर राव यांनी केले. यावेळी मांडसोभाणचे एरीक ओजारियो व लुईस पिंटो हे उपस्थित होते.